Cyclone-Shakhti
Cyclone-Shakhti

Cyclone Shakhti : राज्यात पुन्हा जोरदार पाऊस; 'या' जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा

जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • राज्यात पुन्हा जोरदार पाऊस बरसणार

  • 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा

  • जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस

(Cyclone Shakhti ) राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांच्या पीकांचे अतोनात नुकसान झालं.

राज्यात 8 ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेईल असे देखील सांगण्यात आले असे असतानाच महाराष्ट्रावर आणखी एक संकट येत असल्याचा इशारा दिला आहे. 4 ते 7 ऑक्टोबर दरम्यान भारतीय हवामान विभागाने ‘शक्ती’ चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान विभागाने ‘शक्ती’ चक्रीवादळाचा इशारा देत मुंबईसह कोकण किनारपट्टीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

राज्यातील शेतकरी आधीच अतिवृष्टीने हैराण झाला असून आता नव्या संकटाची शक्यता आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्यांसाठी इशारा देण्यात आला आहे. यासोबतच मराठावाडा आणि पुर्व विदर्भात देखील पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

सर्व जिल्ह्यांमध्ये मदत पथकांना मदतीस सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले असून समुद्रकिनारी जाणाऱ्या नागरिकांना, पर्यटकांना तसेच मच्छिमारांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com