Sina River : मुसळधार पावसामुळे सीना नदीला पुन्हा एकदा महापूर; अनेक गावात शिरलं पाणी
थोडक्यात
अहिल्यानगरमध्ये मुसळधार पावसामुळे सीना नदीला पुन्हा एकदा महापूर
अनेक गावात पुन्हा शिरलं पाणी
सीना नदीत सुमारे 1 लाख 54 हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु
( Sina River ) राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांच्या पीकांचे अतोनात नुकसान झालं आहे.
जिल्ह्यात सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आला असून पाण्याचा प्रवाह वाढला आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या माढा, करमाळा, मोहोळ, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापुरातील अनेक गावात पुन्हा पाणी शिरलं असून सीना नदीत सुमारे 1 लाख 54 हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
सीना नदी काठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह सुरू असलेला मुसळधार पाऊस असाच सुरू राहिल्यास राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. आज देखील हवामान खात्याकडून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.