Beed Heavy Rain
Weather Update
Beed Heavy Rain : बीडमध्ये पुन्हा एकदा पावसाचा कहर; नदीला पूर
मध्यरात्री आलेल्या जोरदार पावसानंतर नदीला पूर
थोडक्यात
बीडमध्ये पुन्हा एकदा पावसाचा कहर
माजलगावच्या नाकलगावमध्ये नदीला पूर
मध्यरात्री आलेल्या जोरदार पावसानंतर नदीला पूर
(Beed Heavy Rain ) राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांच्या पीकांचे अतोनात नुकसान झालं.
यातच आता बीडमध्ये पुन्हा एकदा पावसाचा कहर पाहायला मिळतो आहे. माजलगाव तालुक्यातील नाकलगाव पिंपळगाव परिसरात मध्यरात्री पावसाने जोरदार हजेरी लावली असून नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले हे पाणी जिल्हा परिषद शाळेत शिरले आहे.
शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. माजलगाव तालुक्यातील गोदापट्ट्यातील अनेक गावात पूर परिस्थिती पाहायला मिळत असून घरांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.