Weather Update
Weather Update
Weather Update : 'या' जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता; नागरिकांनी काळजी घ्यावी, हवामान विभागाकडून आवाहन
राज्यभरात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे.
(Weather Update ) राज्यभरात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. यातच आता पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे.
यातच मुंबईमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून पुढील 24 ते 48 तास अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरीतही अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
यासोबतच पालघरमध्ये अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला असून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे हवामान विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.