Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर अवकाळी संकट; शेतकऱ्यांची चिंता वाढणार
थोडक्यात
महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी संकट
शेतकऱ्यांची चिंता वाढणार
अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टीवर पावसाचा अंदाज
( Maharashtra Weather Update) राज्यात पावसाने विश्रांती घेतली असतानाच आता उकाड्याचा जोर वाढला आहे. मात्र पुन्हा एकदा काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरूवात झालेली पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असून महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी संकट आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता आता वाढणार आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टीवर शनिवार आणि रविवार असे 2 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अकोला,नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बुलढाणा, चंद्रपूर या जिल्ह्यांना हवामानातील बदलामुळे यलो अलर्ट देण्यात आला आहे.
28 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात मध्यम पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. कापणीला आलेल्या भातपिकाला याचा फटका बसला आहे.
