Maharshtra Weather Update
Maharshtra Weather Update

Maharshtra Weather Update : 'या' भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

पुढील 2 ते 3 दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • पुढील 2 ते 3 दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता

  • रायगडसह कोकणात 30 ऑक्टोबरपर्यंत यलो अलर्ट

  • मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

( Maharashtra Weather Update) राज्यात पावसाने विश्रांती घेतली असतानाच आता उकाड्याचा जोर वाढला आहे. मात्र पुन्हा एकदा काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरूवात झालेली पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असून महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी संकट आहे.

या पावसामुळे शेतकऱ्यांची देखील चिंता वाढणार आहे. अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टीवर 2 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील 2 ते 3 दिवस राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून रायगडसह कोकणात 30 ऑक्टोबरपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तसेच हवामान विभाग आणि भारतीय तट रक्षकदलातर्फे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com