Maharashtra Weather Update
Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update : पुढील दोन - तीन दिवसांत महाराष्ट्रातून पावसाचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता

14 सप्टेंबर रोजी नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास राजस्थानमधून सुरू झाला
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • पुढील दोन दिवसात पाऊस माघार घेण्याची शक्यता

  • महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागातून मोसमी वारे माघारी फिरतील

  • 14 सप्टेंबर रोजी नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास राजस्थानमधून सुरू झाला

(Maharashtra Weather Update ) राज्यात गेल्या काही दिवसांत जोरदार पाऊस पडला. अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांच्या पीकांचे अतोनात नुकसान झालं.

यातच आता पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रातून पाऊस परतण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागातून मोसमी वारे माघारी फिरतील. जून , जुलै रोजी पावसाचे प्रमाण कमी मात्र सप्टेंबर महिन्यात पडलेल्या पावसामुळे सरासरी ओलांडणे सहज शक्य झाले.

14 सप्टेंबर रोजी नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास राजस्थानमधून सुरू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत असून ब्रह्मपुरी येथे गुरुवारी 34.8 कमाल तापमान नोंदवले गेले जे सर्वाधिक होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com