Maharashtra Weather Update : यंदा नोव्हेंबरमध्ये गारवा नाही तर मुसळधार पावसाची शक्यता
थोडक्यात
नोव्हेंबर महिन्यात राज्यात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक राहण्याची शक्यता
नोव्हेंबर महिन्यात राज्याबरोबरच संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता
नोव्हेंबर महिन्यात फारशी थंडी पडणार नसल्याची माहिती
( Maharashtra Weather Update) राज्यात पावसाने विश्रांती घेतली असतानाच आता उकाड्याचा जोर वाढला आहे. मात्र पुन्हा एकदा काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरूवात झालेली पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असून महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी संकट आहे.
यातच यंदा नोव्हेंबरमध्ये गारवा नाही तर मुसळधार पाऊस असण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात वायव्य भारताचा काही भाग वगळता देशाच्या अनेक भागांत किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.राज्यात किमान तापमान अधिक राहणार असल्याने नोव्हेंबर महिन्यात फारशी थंडी पडणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
राज्यात नोव्हेंबर महिन्यात थंडी कमी असेल. याचबरोबर देशातील अनेक भागांत किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर नोव्हेंबर महिन्यात राज्यात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.नोव्हेंबर महिन्यात राज्याबरोबरच संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
