Sindhudurg Rain : सिंधुदुर्गात अवकाळी पावसाचं धुमशान; आजही जिल्ह्याला यलो अलर्ट जारी
थोडक्यात
सिंधुदुर्गात अवकाळी पावसाच धुमशान
कापणीला आलेला भात धोक्यात
आजही जिल्ह्याला येलो अर्लट जारी
(Sindhudurg Rain) राज्यात पावसाने विश्रांती घेतली असतानाच आता उकाड्याचा जोर वाढला आहे. मात्र आता सिंधुदुर्गात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. पुन्हा एकदा काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरूवात झालेली पाहायला मिळत आहे.
सिंधुदुर्गात अवकाळी पावसाचं धुमशान घातलं असून आजही जिल्ह्याला यलो अर्लट जारी करण्यात आला आहे. भातशेती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणीला आलेल्या भातपिकाला याचा फटका बसला आहे. दिवाळीपूर्वी भातकापणी पूर्ण करण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत असतानाच या अवकाळी पावसाने संकट उभे केलं आहे.
हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी पुढील काही दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
