Weather Update
Weather Update
Weather Update : कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
राज्यात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे.
(Weather Update ) राज्यात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. यातच आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे.
कोकण, घाटमाथ्यावर पावसाची जोरदार हजेरी लावली आहे. आजपासून राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होणार असला, तरी कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.