ढोल ताशाच्या गजरात  पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचे जंगी स्वागत

ढोल ताशाच्या गजरात पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचे जंगी स्वागत

पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचे जंगी स्वागत करण्यात आलं. ढोल ताशाच्या गजरात कार्यकर्त्यांनी शक्तीप्रदर्शन केलं.
Published by  :
Team Lokshahi

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस कडून मुकाई चौक येथे ढोल ताशाच्या गजरात अजित पवार यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.

क्रेनने हार आणि जेसीबीच्या मदतीने पुष्पवृष्टी देखील करण्यात आली.

अजित पवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे.

त्यांच्यावर पुष्प वर्षावदेखील करण्यात आला.

अजित पवार यांना पिंपरी-चिंचवडमधील अनेक कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा देखील आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com