वेब स्टोरीज
वर्ल्डकप फायनल पाहण्यासाठी स्टेडियमवर सेलिब्रिटींची मांदियाळी; फायनल पाहायला कोण-कोण येणार?
विश्वचषकाच्या महायुद्धातल्या निर्णायक लढाईसाठी अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम सज्ज झालं आहे. हा महामुकाबला पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटी येणार आहेत.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी क्रिकेट वर्ल्डकपचा महामुकाबला पाहायला येणार आहेत.

ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्ससुद्धा उपस्थित राहणार आहेत.

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप मेगाफायनल सचिन तेंडुलकरदेखील हजेरी लावणार आहे.

गृहमंत्री अमित शाहदेखील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पाहायला येणार आहेत.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप मेगाफायनल पाहायला कपिल देवदेखील येणार आहेत.

प्रसिद्ध अभिनेते रजनीकांतदेखील उपस्थित असणार आहेत.

टीम इंडियाचे माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसुद्धा उपस्थित असेल.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे देखील सामना पाहायला येणार आहेत.