जरांगे पाटलांच्या मातोश्रीही मैदानात; हात उंचावून आंदोलकांना केलं अभिवादन

जरांगे पाटलांच्या मातोश्रीही मैदानात; हात उंचावून आंदोलकांना केलं अभिवादन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील आंतरवाली सराटी गावात जाहीर सभा होत असून, मनोज जरांगे या सभेला संबोधित करणार आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील आंतरवाली सराटी गावात जाहीर सभा होत असून, मनोज जरांगे या सभेला संबोधित करणार आहे.

रात्रीपासून यासाठी मोठी गर्दी झाली आहे.

या सभेला राज्यभरातील मराठा बांधव उपस्थित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

तसेच या सभेसाठी मनोज जरांगे यांच्या मातोश्री देखील सहभागी झाल्या आहेत.

मनोज जरांगे यांच्या आईचे काही वेळापूर्वी सभेच्या ठिकाणी दाखल झाल्या आहेत.

यावेळी जरांगे पाटलांच्या मातोश्री व्यासपीठावर दाखल झाले असून, त्या देखील आपल्या मुलाचे भाषण ऐकण्यासाठी सभेच्या ठिकाणी थांबणार आहे.

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या आई व्यासपीठावर दाखल होताच जोरदार घोषणाबाजी देखील झाल्याचे पाहायला मिळाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com