Metro 2A and Metro 7
Metro 2A and Metro 7Team Lokshahi

‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मुंबईकरांच्या जीवनाचा नवीन साथीदार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटद्वारे ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’चे काही फोटो शेअर केले आहेत.
Published by :
shweta walge

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटद्वारे ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’चे काही फोटो शेअर केले आहेत.

फोटो शेअर करत फडणवीसांनी या मेट्रोंचा उल्लेख ‘मुंबईकरांच्या जीवनाचा नवीन साथीदार’ असा केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज मुंबईत ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’च्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पणानंतर शुक्रवारी दुपारी ४ वाजल्यापासून मेट्रो २ अ आणि ७ मेट्रो पूर्ण क्षमतेने धावणार आहे.

मेट्रो २ अ मार्गिकेचा दहिसर पूर्व ते डहाणूकरवाडी व मेट्रो ७ चा दहिसर पूर्व ते आरे, हा पहिला टप्पा एप्रिलमध्येच सुरू झाला. आता मेट्रो २ अ चा वळनई ते अंधेरी पश्चिम तर मेट्रो ७ चा गोरेगाव पूर्व ते गुंदवली, असा दुसरा टप्पा सुरू होत आहे.

या मार्गिकांमुळे मुंबईकरांना १५ किमी अंतरासाठी फक्त ३० रुपये खर्च करून अर्धा तासांत इच्छित स्थळी पोहोचता येणार आहे.

या मेट्रोमुळे दहिसर ते अंधेरी प्रवास जलद आणि सुखकर होणार आहे.

प्रवाशांसाठी मेट्रोमध्ये विविध सुविधा देण्यात आल्या आहेत.

लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मेट्रो स्टेशनवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com