अजित पवारांच्या निवासस्थानी भाऊबीज साजरी; सुप्रिया सुळेंनी केले औक्षण

अजित पवारांच्या निवासस्थानी भाऊबीज साजरी; सुप्रिया सुळेंनी केले औक्षण

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार कुटुंबाचा पहिलाच दिवाळी पाडवा आणि भाऊबीज होणार का याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. परंतु, आता पूर्णविराम मिळाला आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार कुटुंबाचा पहिलाच दिवाळी पाडवा आणि भाऊबीज होणार का याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. परंतु, आता पूर्णविराम मिळाला आहे.

सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत अजित पवारांची औक्षण करताना सुप्रिया सुळे दिसत आहेत.

सर्व बहिणींसह त्यांनी अजित पवारांना भाऊबीज केली आहे.

यावेळी सुप्रिया सुळेंनी अजित पवारांचे आशीर्वादही घेतले आहे.

तर, याआधाही अजित पवार काल संध्याकाळी स्नेहभोजनासाठी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या फोटोंमुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com