Maharashtra Lockdown: सावधान! रात्र वैऱ्याची आहे… ८ वाजल्यापासून राज्यभरात संचारबंदी लागू

Maharashtra Lockdown: सावधान! रात्र वैऱ्याची आहे… ८ वाजल्यापासून राज्यभरात संचारबंदी लागू

Published by :
Published on

राज्यभरात आज रात्री आठ वाजल्यापासून सर्वत्र वीकएन्ड लॉकडाऊनला सुरुवात होत आहे. आज रात्री आठ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत ही संचारबंदी कायम राहील. यावेळी विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई होणार असून कोविड नियमांची कडक अंमलबजावणी होणार आहे.

याचसोबत राज्यभरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असणार आहे. वीकएन्डला सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरेंट्स बंद असतील. मात्र काही ठिकाणी घरपोच सेवा मिळणार आहे. लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू असणार आहेत. तसेच अत्यावश्यक मालाची वाहतूक आणि शेतमालाची वाहतूक सुरू असेल. याचसोबत शनिवार आणि रविवारी खासगी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com