Budget 2022: एमएसपीसाठी 2.7लाख कोटी रुपयांची मदत करणार?

Budget 2022: एमएसपीसाठी 2.7लाख कोटी रुपयांची मदत करणार?

Published on

शेती पध्दतीमध्ये बदल त्याचबरोबर शेतीमालाच्या दराला घेऊन यंदाच्या संसदीय अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली जात आहे. पुढील आर्थिक वर्षात सरकार शेतकऱ्यांना (MSP) एमएसपी अंतर्गत 2.7 लाख कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा (Finance Minister ) अर्थमंत्र्यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात केली.

कृषी (Agricultural) क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळण्याची अपेक्षा असून, ते अधिक चांगल्या पद्धतीने उत्पादनवाढ करण्यात उपयोगी पडणार आहे. 24 जानेवारीच्या आकडेवारीनुसार केंद्राने सध्या सुरू असलेल्या विपणन सत्र 2021-22 मध्ये आतापर्यंत 606.19 लाख टन धान खरेदी केले आहे. सर्वाधिक धानाची खरेदी पंजाबमधून झाली आहे.

मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, "आतापर्यंत सुमारे 77 लाख शेतकऱ्यांना 1,18,812.56 कोटी रुपयांच्या किमान आधारभूत किंमतीचा (एमएसपी) लाभ झाला आहे."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com