Saturn Rings
Saturn Rings

Saturn Rings: शनी ग्रहाभोवतीचं कडं २०२५ सालात अदृश्य होणार?

शनी ग्रहाचे वलय मार्च 2025 मध्ये पृथ्वीवरून अदृश्य होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. जाणून घ्या काय आहे कारण?
Published by :
Published on

शनी या ग्रहाचा ज्योतिषशास्त्रात विशेष स्थान आहे. तसेच खगोलप्रेमींमध्येही हा ग्रह विशेष प्रिय आहे तो आपल्या कड्यामुळे. दुर्बिणीतून अवकाशातील शनी ग्रहाचे निरिक्षण केल्यास त्याभोवती आकर्षक कडं म्हणजेच (Saturn Rings) आपल्याला दिसतात. मात्र, आता हे कडं २०२५ मध्ये अदृश्य होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मार्च 2025 मध्ये, शनीच्या अक्षाच्या (Axis) झुकावामुळे त्याच्या वलयांचे पृथ्वीवरून दिसणे बंद होईल. या अदृश्यतेमुळे शनीचे रिंग पृथ्वीवरील निरीक्षकांना दिसणार नाहीत. शनीच्या या कड्यांचं अस्तित्व कायमचं नाही. ग्रहाच्या प्रदक्षिणेच्या दरम्यान, प्रत्येक 29.5 वर्षांच्या अंतराने ते तात्पुरते अदृश्य होतात. मार्च 2025 मध्ये, शनीच्या अक्षीय झुकावामुळे कडांच्या दृश्यतेत बदल होईल, परंतु नंतर नोव्हेंबरमध्ये ते पुन्हा दिसून येतील. शनीचा झुकाव सूर्याच्या दिशेने असल्यामुळे रिंग्जचा कडा प्रकाशमान होतो.

शनी ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी सुमारे 29.4 पृथ्वी वर्षे लागतात आणि तो 26.73 अंशांच्या कोनात झुकलेला असतो त्यामुळे रिंग्ज दिशा बदलताना दिसतात. मार्च 2025 मध्ये, कमीत कमी प्रकाश परावर्तित करणाऱ्या रिंगांच्या फक्त कडा दृश्यमान असतील. ही घटना दर 13 ते 15 वर्षांनी होते, शेवटची घटना 2009 मध्ये होती.

कशापासून बनल्या आहेत शनीच्या कड्या?

शनीचं हे कडं म्हणजे बर्फ, खडकाचे तुकडे आणि अंतराळातील धूळीपासून बनलं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर हे घटक शनी ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या गोल फिरतात. मात्र ते रिंग्स असल्याचा आपल्याला भास होतो. शनी ग्रहाच्या रिंग्स या दुर्बिणीने पाहिल्यास अत्यंत मोहक दिसतात.

शनि आणि त्याचे रिंग

शनि हा सूर्यापासून सहावा ग्रह आहे आणि सौरमालेतील दुसरा सर्वात मोठा (गुरू नंतर) आहे. शनीच्या वलयांची रुंदी सुमारे २८२,००० किलोमीटर आहे. तसेच १० ते ३० मीटर जाड आहेत. यामध्ये ७ प्राथमिक कड्या आहेत. ज्या वेगवेगळ्या वेगाने शनीला प्रदक्षिणा घालतात. सूर्यमालेत शनीला सर्वाधिक चंद्र म्हणजेच १४६ उपग्रह आहेत. शनि हा मुख्यतः हायड्रोजन आणि हेलियमचा बनलेला एक वायू ग्रह आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com