टूलकिट प्रकरण : महिला आयोगाची दिल्ली पोलिसांना नोटीस

टूलकिट प्रकरण : महिला आयोगाची दिल्ली पोलिसांना नोटीस

Published by :
Published on

लोकशाही न्यूज नेटवर्क
दिशा रवीच्या अटकेवरून देशात राजकारण तापत चालले आहे. शेतकरी आंदोलनाशी सबंधित असणारे टूलकिट प्रकरणाला रोज नवनवीन वळणे येत आहेत. आता याप्रकरणी दिल्लीच्या महिला आयोगाने सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त आणि दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवली आहे.

या नोटीसमध्ये महिला आयोगाने पोलिसांना एफआयआरच्या प्रतीला स्थानिक न्यायालयात ट्रान्झिट रिमांडसाठी सादर न केल्याची कारणे आणि सविस्तर कारवाईचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. यासंदर्भात दिल्ली पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी "हवामान कार्यकर्ती दिशाची अटक कायद्यानुसारच करण्यात आली आहे. २२ वर्षांच्या किंवा 50 वर्षांच्या व्यक्तीमध्ये कोणताही फरक केला जाऊ शकत नाही." अशी माहिती माध्यमांना दिली आहे.

22 वर्षीय कार्यकर्तीला अटक केल्यावरून सध्या पोलिसांवर टीकेची झोड उठत आहे, त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. अशाप्रकारची टीका चुकीची असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविणार्‍या दिशाला रविवारी बेंगळुरू येथून अटक करण्यात आली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com