Year Ender 2024: म्युझिक कॉन्सर्ट ते अंबानींचा शाही लग्नसोहळा, 2024 मध्ये भारतात हॉलिवूड कलाकारांची मांदियाळी
या वर्षी देशात अनेक मोठ्या घटना घडल्या ज्यांची खूप चर्चा झाली. ज्यामध्ये अनंत अंबानींचे लग्न हे या वर्षाच्या शेवटपर्यंत सोशल मीडियावर ट्रेंड बनून राहिला आहे. हे लग्न एवढ ग्लॅमर वाढवणार होत की, या लग्नासाठी अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू अनेक नावाजलेल्या लोकांना आंमत्रण देण्यात आलं होत. बॉलिवूडसह चक्क हॉलिवूड स्टार्सला देखील या लग्नाचं आमंत्रण देण्यात आलं होते. हेच हॉलिवूड स्टार्स मुंबईतील म्युझिक कॉन्सर्टला देखील आपली हजेरी लावताना दिसून आले. जाणून घ्या हे हॉलिवूड स्टार्स कोण आहेत.
गायिका रिहाना
सिंगर रिहाना ही अंबानींच्या लग्नात तसेच त्यांच्या प्री वेडिंग पार्टीसाठी देखील भारतात आली होती. यावेळी तिने अंबानींच्या लग्नात परफॉर्म देखील केला. यामुळे तिचे सोशल मीडियावर भारतीय फॅन्सची देखील भर पडली.
जस्टिन बीबर
सिंगर रिहानासह जस्टिन बीबर सुद्धा अंबानींच्या लग्नात परफॉर्म करण्यासाठी भारतात आला होता. जस्टिनच्या संगीत परफॉर्मन्सने अनेक दिवस सोशल मीडियावर वर्चस्व गाजवले. अनंत अंबानींच्या लग्नात दोघांनीही अप्रतिम संगीतमय परफॉर्मन्स दिला.
किम कार्दशियन
किम कार्दशियन हिने देखील अनंत अंबानींच्या लग्नात तिच्या बहिणीसोबत हजेरी लावली होती. किम कार्दशियन ही हॉलिवूडची प्रसिद्ध रिॲलिटी शो स्टार, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि अभिनेत्री आहे. किमला भारतामध्ये येऊन ऑटोमधून केलेली मुंबई सफारी फार आवडली होती. किम आणि तिच्या बहिणीची ड्रेसिंग स्टाइल आणि गेटअप फार वेगळा आणि आकर्षक होता.
जॉन सीना
हॉलिवूड स्टार आणि डब्ल्यू-डब्ल्यू ई फेम जॉन सीना याने देखील अंबानींच्या घरी लग्नासाठी आपली उपस्थिती दाखवली होती. याच्यासोबत प्रियांका चोप्रा आणि तिचा पति निक याने देखील अंबानींच्या लग्नाला हजेरी लावली होती. यादरम्यान जॉन सीना अंबानींच्या लग्नात ढोलवर ठेका धरताना पाहायला मिळाला होता.
डीजे ॲलन वॉकर
मुंबईत झालेल्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये डीजे ॲलन वॉकरने भारतात येऊन आपल्या शानदार डीजे परफॉर्मन्सने प्रेक्षकांना वेड लावले. त्याच्या या परफॉर्मन्सवर अनेक भारतीय प्रेक्षकांनी त्याचे कौतुक देखील केले.
एड शिरीन
एकाच मंचावर दोन अप्रतिम गायकांना पाहणे आणि ऐकणे हा प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय अनुभव होता. ब्रिटीश गायक एड शिरीननेही दिलजीत दोसांझच्या मुंबई कॉन्सर्टमध्ये नेत्रदीपक परफॉर्मन्स दिला. एड शिरीनने कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्येही दिसली होती.
दुआ लिपा सिंगर
हॉलिवूड गायिका दुआ लिपा हिनेही भारतात येऊन मुंबईत म्युझिक कॉन्सर्ट तिचा संगीत कार्यक्रम केला. या कॉन्सर्टमध्ये बॉलिवूडच्या अनेक स्टार किड्सनीही सहभाग घेतला होता.