Year Ender2024: 2024मध्ये 'या' मराठी अभिनेत्री बनल्या बिझनेस वुमन; पाहा कोण आहेत...
2024 संपून नवीन वर्ष 2025 सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. 2024 या वर्षात अनेक गोष्टी घडल्या ज्यामध्ये काही चित्रपट हे बॉक्स ऑफिसच्या शर्यतीत उंच शिखरावर पोहचले तर काही वेब सिरीजने प्रेक्षकांच्या मनात आपल अधिराज्य गाजवलं. तर दुसरीकडे अनेक मराठी तसेच हिंदी आणि दक्षिणात्य कलाकार हे लग्नबंधनात अडकले. काहींनी त्यांच्या नव्या पाहुण्यांची गोड बातमी देखील माध्यमांना दिली. एवढ सगळ होत असताना मराठी अभिनेत्रींनी आपल्या करिअरला एक वेगळंच वळण दिलं आहे. मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री 2024मध्ये बिझनेस वुमन बनल्या आहेत, जाणून घ्या कोण आहेत.
'चला हवा येऊ द्या' फेम श्रेया बुगडेने दादरमध्ये स्वत:चं रेस्टॉरंट सुरु केलं 'द बिग फिश अँड कंपनी' असं तिच्या रेस्टॉरंटचं नाव हे रेस्टॉरंट सीफुडसाठी स्पेशल आहे.
मृणाल व तिचा पती नीरज यांनी देखील ठाण्यातील घोडबंदर येथील हिरानंदानी ईस्टेटमध्ये 'बेली लाफ्स' हे रेस्टॉरंट सुरु केलं आहे.
अभिनेत्री रेश्मा शिंदेने देखील पालमोनास या ब्रँड सोबत पार्टनरशिप करून पुणे कोथरूड येथे स्वतःचं ज्वेलरी स्टोअर उघडलं आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री श्रद्धा कपूर पालमोनास या ज्वेलरी ब्रँडची को फाउंडर आहे. त्यामुळे अभिनेत्री श्रद्धा कपूरचा तिच्या व्यवसायाशी खास संबंध आहे.
लोकप्रिय मराठी मालिका 'तुझ्यात जीव रंगला' मधील पाठकबाई म्हणून ओळखली जाणारी अक्षय देवधर हिने तिच्या साडीच्या ब्रँड सुरु केला आहे ज्याचं नाव 'भरजरी' आहे.
तेजस्विनी पंडितने अभिनेत्री अभिज्ञा भावेसह मिळून 'तेजज्ञा' हा कपड्यांचा ब्रँड सुरू केला आणि आता तिने पुण्यात एक आलिशान सलोन सुरू केलं असून तिच्या या सलोनचं नाव 'एम टू एम' असं आहे. या सलोनच्या उद्घाटनासाठी अनेक दिग्गज मंडळी उपस्थित लावली होती ज्यात मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन झालं होत.