Year Ender2024: 2024मध्ये सरकारी योजनांचा पाऊस...

Year Ender2024: 2024मध्ये सरकारी योजनांचा पाऊस...

सरकारी योजनांचा 2024मध्ये पाऊस, नवीन योजनांचा संपूर्ण आढावा घ्या, यावर्षीच्या योजनांनी जनतेला दिला दिलासा.
Published by :
Prachi Nate
Published on

2024 हा वर्ष संपण्यापुर्वी केंद्र आणि राज्य सरकारने अशा लाभदायी योजना आणल्या ज्यामुळे केवळ भारतचं विकसाच्या पाऊलांवर चालला असं नाही तर देशातील अनेक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन स्वयंरोजगाराच्या दिशेने वाटचाल करू लागल्या, त्याचसोबत अनेक बेरोजगारी तसेच सामान्य माणसांच्या अडचणीचे प्रश्न सुटण्यासाठी मदत मिळू लागली. केंद्र आणि राज्य सरकारने 2024 मध्ये कोणत्या योजना सुरू केल्या आहेत हे जाणून घ्या.

पीएम विद्या लक्ष्मी योजना

6 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली. मोदी सरकारने विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पीएम-विद्यालक्ष्मी योजना सुरू केली आहे. पीएम विद्या लक्ष्मी योजनेंतर्गत उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी कोणत्याही हमीशिवाय 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. विद्यार्थ्यांना सरकारकडून 75 टक्के क्रेडिट गॅरंटी मिळेल. ही योजना देशभरातील सरकारी आणि खाजगी उच्च शिक्षण संस्थांना लागू जे एनआयआरएफच्या टॉप 100 रँकिंगमध्ये असतील. या योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक अडचणी येऊ नये असा आहे.

पीएम सखी योजना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच एलआयसीची 'बीमा सखी योजना' सुरू केली आहे. या योजनेंतर्गत महिलांना पुढील ३ वर्षांसाठी विशेष प्रशिक्षण तसेच पहिल्या वर्षी 7,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 6,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये महिना मानधन मिळेल. योजनेंतर्गत महिलांना विमा प्रतिनिधी बनवले जाणार असून विमा सखी योजनेच्या माध्यमातून विमा जनजागृती करण्यात येईल. ज्या महिलांनी 10 वी उत्तीर्ण केली आहे, त्या भारतीय LIC च्या विमा सखी योजनेचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये त्या महिला 18 ते 70 वर्षे वयोगटातील असाव्यात. तसेच महिलांना आर्थिक स्तरावर सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

पीएम सौर गृह योजना

15 फेब्रुवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत देशातील लोकांना त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनेल बसवण्यासाठी अनुदान दिले जाईल तसेच सौर पॅनेल्सच्या किमतीवर 40% पर्यंत सब्सिडी दिली जाईल.

आयुष्मान भारत योजना

11 सप्टेंबर 2024 पासून देशातील ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्मान भारत योजनेचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व वृद्ध नागरिकांना 5 लाखांचे आरोग्य विमा संरक्षण दिले जाणार आहे. या योजनेचा उद्देश असे आहे की, सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीच्या आधारावर योजनेचा फायदा घ्याता यावा.

पीएम इंटर्नशिप योजना

21 ते 24 वर्ष वयाचे तरुणांसाठी पीएम इंटर्नशिप योजना सुरु करण्यात आली. या योजनेत तरुणांना 12 महिन्यांसाठी 5,000 रुपये मासिक आर्थिक मदत तसेच 6,000 रुपये अनुदान मिळेल. या वर्षात 1.25 लाख इंटर्नशिपच्या संधी दिल्या जातील आणि यावर 800 कोटी रुपये खर्च होईल. तरुणांना योग्य तो अनुभव नसल्यामुळे त्यांना जॉब मिळण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. यावर उपाय म्हणून पीएम इंटर्नशिप योजना सुरु करण्यात आली.

वन नेशन वन सब्सक्रिप्शन योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने युवांसाठी 'वन नेशन वन सब्सक्रिप्शन' योजना सुरू केली असून या योजनेसाठी 2025, 2026 आणि 2027 या तीन वर्षांसाठी सुमारे 6,000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. 'वन नेशन वन सब्सक्रिप्शन' योजनेच्या मदतीने सरकारी विद्यापीठे, महाविद्यालये, आणि संशोधन संस्थांना अधिक माहिती पोहोच मिळेल. ज्यामुळे भारतातील विद्यार्थ्यांना आणि शाळांना उच्च शिक्षण, संशोधन आणि विकासाच्या क्षेत्रात अधिक उत्तम साधनं उपलब्ध करून देईल. या योजनेचा फायदा देशभरातील उच्च शिक्षण संस्थांना मिळेल, आणि त्यांना 'सूचना आणि पुस्तकालय नेटवर्क' द्वारे एक राष्ट्रीय सब्सक्रिप्शन उपलब्ध होईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com