Mumbai

Maharashtra Budget 2022 : लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटी निधी – अजित पवार

Published by : Shweta Chavan-Zagade

गान सम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या नावाने मुंबईत आंतरराष्ट्रीय स्तरावरचे संगीत विद्यालय स्थापन होणार आहे. राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून मुंबई विद्यापीठाच्या कालिना परिसरात हे विद्यालय स्थापन होणार आहे. दरम्यान आज महाविकास आघाडी सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022 Live) सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे स्मारक व्हावे अशी मागणी होत होती. भाजपचे आमदार राम कदम यांनी शिवाजी पार्कात मंगेशकर यांचे स्मारक व्हावे अशी मागणी केली होती. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लता दीदींचे स्मारक राज्य सरकार आणि केंद्र सरकार करतीलच त्याची मागणी करण्याची गरज नाही असे म्हटले होते. तर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शिवाजी पार्काचे स्मशानभूमी करू नका अशी प्रतिक्रिया दिली होती. आता राज्य सरकारने यावर निर्णय घेतला असून लता दीदींच्या नावाने एक आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यालयासाठी १00 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल असेही राज्य सरकारने म्हटले आहे.

६ फेब्रुवारी रोजी लता मंगेशकर यांचे ९२ व्या वर्षा निधन झाले. त्यांना आधी कोरोनाची लागण झाली होती, तर नंतर न्युमोनियाची लागण झाली. ब्रीच कँडी या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी मल्टिपल ऑर्गन फेल्युअरने त्यांचे निधन झाले. मुंबईच्या शिवाजी पार्कात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. यावेळी त्यांचे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, शाहरुख खान, रणबीर कपूर, जावेद अख्तरसह अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा