Vidhansabha Election

विधानसभेसाठी काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्यांच्या 11 सभा होणार

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • विधानसभेसाठी काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या 11 सभा होणार

  • राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभा होणार

  • या सभेला ठाकरे गट आणि शरद गटातील प्रमुख नेतेही उपस्थित राहणार

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.

राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद, सभा घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर विधानसभेसाठी काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या 11 सभा होणार असल्याची माहिती मिळत आहे. राहुल गांधी यांच्या 3 सभा, प्रियंका गांधी यांच्या 3 सभा तर मल्लिकार्जुन खर्गे यांच्या 5 सभा महाराष्ट्रात होणार आहे.

या सभेला ठाकरे गट आणि शरद गटातील प्रमुख नेतेही उपस्थित राहणार असून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे 12, 14 व 16 नोव्हेंबर रोजी प्रचारसभा घेणार आहेत. 13, 16 व 17 नोव्हेंबरला प्रियंका गांधी या सभा घेणार असून मल्लिकार्जुन खरगे हे 13 ते 18 नोव्हेंबर पाच दिवस सभा घेणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?