संजय देसाई, सांगली | संजय राऊत शपथ देत नाहीत मुख्यमंत्र्यांना कितीही मुख्यमंत्र्यांची आणि पवारांची मांडणी केली तरी. शपथ राज्यपालांनाच द्यावी लागते," असा टोला महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना लगावला आहे.
भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन आज सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय असंवैधानिक असल्याचं सांगत सांगत निलंबन रद्द केलं. या निर्णयानंतर आता सत्ताधारीविरुद्ध विरोधक असे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत.
महाविकास आघाडीच्या १२ आमदारांची नियुक्ती करण्यासंदर्भातील निर्णय न्यायलयाने दिला नाही पण भाजपाच्या बाजूने निर्णय देतं अशी टीप्पणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. राऊतांच्या याच विधानाला घेऊन पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी "संजय राऊतांच्या लेव्हलला जाऊन मला बोलता येत नाही कारण मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारांमध्ये वाढलेलो आहे. तुम्हाला कायदा कळतो? १२ आमदारांच्या नियुक्त्यांमध्ये राज्यपालांचे अधिकार अमर्यादित आहेत. १२ आमदारांच्या निलंबनामध्ये झोडझोड झोडलंय. तीन तारखा चालल्या, निम्म्या वेळ न्यायाधीशच बोलत होते. ते १२ आमदारांच्या वतीने बोलत नव्हते. त्यांना वाटलं तसं म्हणून बोलले," असं चंद्रकांत पाटील प्रतिक्रिया देताना म्हणालेत.
कडेगाव मध्ये भाजपची मोठी ताकद आहे. २०१९ रोजी कडेगाव विधानसभा जर भाजपने लढवली असती तर भाजपचा उमेदवार विजयी झाला असता. मात्र, आम्ही युती धर्म पाळला आणि ती जागा शिवसेनेला सोडली मात्र शिवसेनेने हा मतदारसंघ काँग्रेस ला विकला. त्यामुळेच काँग्रेस कडेगाव मध्ये विजयी झाली. येणाऱ्या निवडणुकीत भाजपचाच उमेदवार विजयी होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.