Pashchim Maharashtra

तब्बल 134 सीसीटीव्ही तपासले, पोलिसांना चकवण्यासाठी आरोपी दुसऱ्याच गुन्ह्यात सरेंडर

Published by : left

प्रशांत जगताप, सातारा | संपुर्ण सातारा जिल्हयाला (Satara District) हादरवून सोडणाऱ्या 4 वर्षीर्य मुलीच्या बलात्कार (Rape Case) प्रकरणात आता नराधम आरोपीला जेरबद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या घटनेत तब्बल 134 सीसीटीव्ही कॅमेरे (134 CCTV) तपासून सुद्गा आरोपी अटकेत आला नव्हता. मात्र आरोपीने बलात्काराच्या गुन्ह्यापासून वाचण्यासाठी अगोदरच्या दरोड्याच्या गुन्ह्यात पोलिसांत स्वतःहून हजर झाला. त्यामुळे पोलिसांना नराधम आरोपींनी अटक करण्यात यश आले.

सातारा (Satara District) जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून फिरस्त कुटुंबातील 4 वर्षीय मुलीचे पहाटेच्या सुमारास अपहरण करून अत्याचार (Rape Case) करणारा नराधम अखेर सातारा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. घटना घडल्या दिवसापासून सातारा शहरासह संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता.आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी शहरातील 134 सीसीटीव्ही कॅमेरे (134 CCTV) तपासले..मात्र पोलिसांच्या हाती यश येत नव्हते.. या आरोपीवर या अगोदर शाहूपुरी,सातारा आणि तालुका पोलिसांत दरोड्याचे एकूण 17 गुन्हा दाखल होता.बलात्काराच्या गुन्ह्यातून वाचण्यासाठी आरोपी हा अगोदरच्या दरोड्याच्या गुन्ह्यात शाहूपुरी पोलिसांत स्वतःहून हजर झाला.

सीसीटीव्ही फुटेज व्हायरल केले

दरम्यानच्या काळात आरोपी मिळत नसल्याने त्याचे सीसीटीव्ही फुटेज (134 CCTV) पोलिसांनी व्हायरल केलं होतं. आरोपीच्या वडिलांनी आणि भावाने हे सीसीटीव्ही फुटेज ओळखून शहर पोलिसांशी संपर्क साधत संबंधित युवक हा माझा मुलगा असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावरून सातारा शहर पोलिसानी शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयित आरोपीस अटक करून हा गुन्हा उघडकीस आणला आहे..

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली