अभिनेता प्रकाश राज आणि सूर्या यांची स्टारकास्ट असलेला 'जय भीम' सिनेमा नुकताच अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला आहे. सध्या सोशल मीडियासह अनेक ठिकाणी या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे.
'जय भीम' हा तमिळ ड्रामा सिनेमा आता भाषिक वादात अडकला आहे. यामुळे दक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातयं. प्रकाश राजने 'जय भीम' सिनेमात एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. मात्र एका सीनमुळे सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
सिनेमातील एका सीनमुळे ट्वविटरवर अभिनेता प्रकाश राज ट्रेंड होताना दिसतोय. हा सीन आता सोशल मीडियावरही वादाचा विषय बनतोय. सीनमध्ये हिंदीत संवाद साधणाऱ्या एका व्यक्तीच्या प्रकाश राज कानाखाली लगावताना दिसतायत. त्यामुळे या सीनवर आणि प्रकाश राज यांच्या भूमिकेवर अनेकजण नाराजी व्यक्त करतायत. तर अनेकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
तर काही यूजर्सनी या सीनचे समर्थन केले आहे. तसेच प्रकाश राज यांच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. प्रकाश राज यांच्या भूमिकेला पाठींबा देत एका युजर्सने लिहिले की, हा सीन हिंदी भाषेच्या विरोधात नाही. यातील व्यक्ती हिंदी बोलून इतरांपासून वाचून पळण्याच्या विचारात असते. (प्रकाश राज यांना हिंदी भाषा समजत नाही असं दाखवलं आहे.) यावेळी प्रकाश राज त्याचा प्लॅन हेरतात आणि कानाखाली लागावत आणि तमिळमध्ये बोलण्यास सांगतात. त्यामुळे तमिळ चित्रपट निर्माते हिंदी भाषेच्याविरोधात नाहीत. असं मत त्या युजर्सने लिहिले आहे. मात्र सोशल मीडियावर या सीनचा वेगवेगळ्या प्रकारे अर्थ काढले जातोय.