Dhananjay Mahadik 
Vidhansabha Election

Dhananjay Mahadik : भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल

लाडक्या बहि‍णींबाबत केलेल्या वक्तव्याची आयोगाकडून दखल

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • धनंजय महाडिक यांना निवडणूक आयोगाची नोटीस

  • लाडक्या बहि‍णींबाबत केलेल्या वक्तव्याची आयोगाकडून दखल

  • आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

सतेज औंधकर, कोल्हापूर

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद, सभा घेत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता भाजप खासदार धनंजय महाडिक यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. राजकीय प्रचाराच्या जाहीर सभेत धनंजय महाडिक यांनी केलेल्या भाषणावर निवडणूक विभागाने आक्षेप घेतला असल्याची माहिती मिळत आहे.

धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर केलेल्या भाषणावर निवडणूक विभागाने आक्षेप घेतला असून नोटीस बजावण्यात आली आहे. वक्तव्याबाबत तात्काळ खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले असून धनंजय महाडिक यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात महाडिकांवर गुन्हा दाखल केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

S. Jaishankar On Donald Trump : भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीवरून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे स्पष्ट विधान; ट्रम्प यांचा दावा पुन्हा फेटाळला

Cotton Market News : कापसाचा दर कमी होण्यासाठी शासन जबाबदार; नागपूर खंडपीठाचे सरकारवर कडक शब्दात ताशेरे

Latest Marathi News Update live : भारत विरूद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात कर्णधार शुभमन गीलचं पहिलं द्विशतक

'Good day' Britannia Company : 'गुड डे' बिस्किटमध्ये जीवंत अळ्या; कंपनीला करावी लागणार इतक्या रुपयांची नुकसानभरपाई