Covid-19 updates

नव्याने आढळून येणाऱ्या कोविड रूग्णांच्या संख्येत मोठी घट

Published by : Lokshahi News

मागील दीड वर्षापासून संपूर्ण जग कोरोना विषाणूसोबत लढत आहे. परंतु या परिस्थितीत एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. देशातील नव्याने आढळून येणाऱ्या कोविड रूग्णांच्या संख्येत काल मोठी घट दिसून आली. गेल्या 24 तासांत देशातील नव्या कोविड रूग्णांची संख्या 31 हजार 222 इतकी नोंदवली गेली आहे. गेल्या 24 तासांत सक्रिय करोना बाधितांची संख्याही चार लाखांच्या खाली आली आहे.

दरम्यान काल दिवसभरात करोनाचे 290 रूग्ण दगावल्याने करोनामुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या आता 4 लाख 41 हजार 42 इतकी झाली आहे. कालची सक्रिय बाधितांची संख्या 3 लाख 92 हजार 864 इतकी होती. एकूण रूग्णांच्या तुलनेत हे प्रमाण 1.19 टक्के इतके आहे. दुसरीकडे देशात लसीकरणाचाही वेग वाढवण्यात आला असून गेल्या 24 तासांत 1 कोटी 13 लाख डोसेस देण्यात आले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."

Nitesh Rane On Thackeray Brothers : "यांच्यात नवरा कोण आणि नवरी कोण?" ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray : ''त्या' बद्दल दिलगिरी व्यक्त'; विजय मेळाव्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट