India

‘अल्ला हूँ अकबर’ची घोषणा देणाऱ्या मुस्कानला दिलं 5 लाखांचं बक्षिस; पाहा कुणी दिलं बक्षिस?

Published by : Lokshahi News
कर्नाटकमध्ये सध्या हिजाब प्रकरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबविरोधातील निदर्शने काढण्यात आली असून त्याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटलेले पाहायला मिळत आहेत.
शाळांसह सर्व शैक्षणिक संस्था तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. उडुपी जिल्ह्यातील मणिपाल येथील महात्मा गांधी मेमोरियल कॉलेजमध्ये भगवी शाल आणि हिजाब घातलेल्या विद्यार्थिनींच्या दोन गटांनी एकमेकांच्या विरोधात घोषणा दिल्याने तणाव वाढला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, मुलांचा एक गट हिजाब परिधान केलेल्या मुलींसोबत गैरवर्तन करताना दिसत होता. या व्हिडिओमध्ये  मुस्कान नावाची तरुणी हिजाब घालून कॉलेजमध्ये आली असता एक जमाव तिच्या दिशेने चालत येतो. यानंतर तो जमाव तरुणीसमोर 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्यास सुरुवात करतात. यानंतर तरुणीदेखील त्यांना उत्तर देत 'अल्लाहू अकबर' ची घोषणा देते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.'अल्ला हूँ अकबर'ची घोषणा देणाऱ्या त्या मुस्कानला 5 लाख रुपयांचे बक्षिस देण्यात आलं आहे. तिच्या बहादुरीवर खूश होऊन जमीयत उलेमा-ए-हिंद या संघटनेच्या वतीनं हे 5 लाख रुपये देण्यात आले आहेत.तिला प्रोत्साहित करण्यासाठी पाच लाख रुपयांचं बक्षिस देत असल्याचं या संघटनेनं म्हटलंय.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा