Horoscope 04 Feb 2026 
राशीभविष्य

Daily Horoscope : ‘या’ राशीच्या लोकांना शेअर्स आणि लॉटरीद्वारे आर्थिक लाभ, वाचा आजचं राशीभविष्य

Published by : Riddhi Vanne

मेष राशी (Aries Daily Horoscope)

आज तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी इच्छित यश मिळेल. तुम्हाला विशेष व्यक्तींकडून मार्गदर्शन आणि सहकार्य प्राप्त होईल. बेरोजगारांना रोजगार मिळेल.

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असा असणार आहे. राजकारणात तुमची पद आणि प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेले मतभेद दूर होतील.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)

आजचा दिवस संघर्षाने भरलेला असेल. सुरू केलेल्या कामात अडचणी येऊ शकतात. अनोळखी व्यक्तीपासून सावध राहा. आपल्या बुद्धीच्या जोरावर काम करा.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope)

आज अस्वस्थ वाटेल. गॅस, अपचनासारख्या समस्या डोकं वर काढतील. मात्र, योग्य उपचार घेतल्यावर बरं वाटेल.

सिंह राशी (Leo Daily Horoscope)

राजकारणात तुमच्या नेतृत्त्वाची प्रशंसा होईल. कुटुंबातील सदस्यांशी नवीन उद्योगाबद्दलची चर्चा सकारात्मक ठरेल. सरकारी नोकरीत तुमच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होईल. लोक तुमच्याशी मैत्री करण्यास उत्सुक असतील.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope)

नोकरीत संयम ठेवणं तुम्हाला फायदा होईल. सामाजिक कार्यांच्या क्षेत्रात तुम्हाला ज्येष्ठ व्यक्तीचे मार्गदर्शन आणि साथ मिळेल. तुमच्या विरोधकांशी अतिरिक्त वाद टाळा आणि त्यांच्याकडून सावध राहा.

तुळ राशी (Libra Daily Horoscope)

नोकरी शोधण्याचं काम थांबेल. नोकरीच्या ठिकाणी नवीन सहकारी मिळतील. नवीन बांधकामाची इच्छा पूर्ण होईल. रचनात्मक कार्यांमध्ये वाढ होईल. दूरच्या देशातून चांगली बातमी मिळेल.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)

नोकरीच्या ठिकाणी तुमच्या विरोधकांच्या षडयंत्रांपासून सावध राहा. व्यापारात चढ-उतार येतील, त्यामुळे अचानक मोठे निर्णय घेणे टाळा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि कार्यक्षेत्र तसेच व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित करा.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)

आज तुमच्या नातेवाईक आणि जवळच्या मित्रांच्या सहकार्यामुळे व्यापारात गती येईल. कार्यक्षेत्रात अडचणी कमी होईल. समाजात उच्चपदस्थ लोकांशी तुमचा संपर्क वाढेल. स्वतःवर विश्वास ठेवा.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope)

आज एखाद्या प्रिय व्यक्तीची भेट होईल. राजकीय महत्वाकांक्षांमध्ये यश मिळेल. कुटुंबातील एखाद्या सदस्यामुळे समाजात तुमचा मान-सम्मान वाढेल. आर्थिक लाभ होईल.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)

मित्रांसोबत व्यवसायिक भागिरादारी करू शकता. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कार्यानुभवाचे कौतुक होईल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील.

मीन राशी (Pisces Daily Horoscope)

तुम्हाला कोणत्यातरी महत्त्वपूर्ण कामाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यांमध्ये सक्रियपणे भाग घ्याल. नोकरीत प्रगती होईल. नवीन मित्रांसोबत पर्यटन स्थळांवर आनंद घेण्याची संधी मिळेल. शेअर्स आणि लॉटरीद्वारे आर्थिक लाभ होईल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा