Rashi Bhavishya 25 Dec 2025 
राशीभविष्य

Horoscope : ‘या’ राशीच्या लोकांनी गुंतवणुकीत जपून पाऊल टाका, नुकसान होण्याची शक्यता, जाणून घ्या

Rashi Bhavishya 25 Dec 2025: आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? जाणून घ्या राशी भविष्य.

Published by : Dhanshree Shintre

मेष (Aries Horoscope)

मानसिक समाधानासाठी तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. दीर्घकाळ अडकलेली देणी अखेर मिळण्याची शक्यता आहे. आजारी नातेवाईकाला भेट दिल्यास आधार मिळेल. कामातील चुका मान्य करून सुधारणा करा आणि कोणाला दुखावले असल्यास माफी मागा.

वृषभ (Taurus Horoscope)

अचानक प्रवासामुळे थकवा जाणवेल, त्यामुळे तेलाने मसाज करून शरीराला विश्रांती द्या. आर्थिक लाभ संभवतो, दान केल्यास मनाला शांतता मिळेल. कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. कामाच्या ताणामुळे अस्वस्थता वाढू शकते, म्हणून संध्याकाळी आराम करा.

मिथुन (Gemini Horoscope)

तुमची तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि सकारात्मक दृष्टिकोन अडचणींवर मात करण्यास मदत करेल. रखडलेली देणी मिळाल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबातील काही गुपिते चकित करतील. लग्नाचा प्रस्ताव आल्याने मन हलके होऊन आनंदाची भावना निर्माण होईल.

कर्क (Cancer Horoscope)

मोतीबिंदू असलेल्या रुग्णांनी प्रदूषण आणि प्रखर सूर्यप्रकाश टाळावे. कुटुंबातील आजारामुळे आर्थिक ताण संभवतो, पण आरोग्यावर लक्ष द्या. सामाजिक सोहळ्यात विनोदीपणामुळे लोकप्रियता मिळेल, तर प्रेमाची संधी साधल्यास हा दिवस अविस्मरणीय ठरेल. ज्ञान व्यक्तिमत्त्वाला धार देईल.

सिंह (Leo Horoscope)

स्वतःमध्ये आशावाद वाढवा, आत्मविश्वास आणि लवचिकता सुधारवा. भीती व द्वेषाचा त्याग करा. खर्चावर नियंत्रण ठेवा, फक्त आवश्यक खरेदी करा. मित्रांसोबत बाहेर जा आणि लवमेटशी संवाद साधून आपल्या भावना स्पष्टपणे मांडाव्यात.

कन्या (Virgo Horoscope)

आरोग्य उत्तम राहील. घरातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कामातून थोडा ब्रेक घ्या आणि मित्रांसोबत बाहेर जा. प्रेमात आनंद मिळेल, काहीजणांची करिअर प्रगती होईल. रात्री वाहन चालवताना सावधगिरी बाळगा, अन्यथा आजारपण किंवा अपघाताची शक्यता आहे.

तूळ (Libra Horoscope)

खेळकूद आणि आऊटडोअर अ‍ॅक्टिव्हिटीमुळे हरवलेली ऊर्जा परत येईल. घरातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मुलांनी अभ्यासावर लक्ष द्यावे. प्रेमात सूड न घ्या, शांत मनाने आपल्या भावना प्रामाणिकपणे व्यक्त केल्यासच योग्य परिणाम मिळतील.

वृश्चिक (Scorpio Horoscope)

आज तुम्ही तुमच्या आरोग्य आणि देखाव्याकडे विशेष लक्ष देऊ शकता. उधारीची परतफेड करावी लागू शकते, ज्यामुळे आर्थिक स्थिती काहीशी तणावाखाली येईल. कामाच्या ताणामुळे कुटुंब आणि मित्रांसाठी वेळ देणे कठीण होईल.

धनु (Sagittarius Horoscope)

आज तुमचे हास्य तुमच्या मानसिक ताण कमी करण्यास मदत करेल. आर्थिक योजना सादर केल्या जातील; निर्णय घेण्याआधी त्यांचे फायदे-तोटे तपासा. घरातील बदलांसाठी सर्वांचा संमती घ्या आणि कामात तुम्ही प्रभावी ठराल.

मकर (Capricorn Horoscope)

आज रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, अन्यथा अडचणी निर्माण होऊ शकतात. आर्थिक निर्णय घेताना काळजीपूर्वक विचार करा. कुटुंबीयांसोबत आनंद मिळेल, व्यवसायात तोटा होऊ शकतो, पण मेहनत योग्य असेल तर यश नक्की मिळेल.

कुंभ (Aquarius Horoscope)

आज सकारात्मक विचारांनी उत्साह वाढवा. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल, नवीन मित्र जोडले जातील. प्रेम जीवनात वळण येईल, संभाव्य विवाह चर्चा होईल. निर्णय घेण्याआधी विचार करा. वरिष्ठांकडून कामाची प्रशंसा मिळेल, व्यक्तिमत्व अधिक आकर्षक ठरेल.

मीन (Pisces Horoscope)

आज व्यायामावर भर देऊन वजन नियंत्रणात ठेवा. गुंतवणूक टाळा. विवाहासाठी अनुकूल काळ आहे, रोमान्सची संधी आहे पण अल्पकाळ टिकेल. महत्वाच्या फाइल्स पूर्णत: तपासूनच वरिष्ठांना द्या. रिकाम्या वेळेत खेळ खेळा, परंतु सुरक्षिततेची काळजी घ्या.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा