मेष (Aries Horoscope)
मोठ्या व मान्यवरांची नाराजी ओढवून घेऊ नये, अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहील. विरोधक डोके वर काढतील. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढण्याची शक्यता राहील.
वृषभ (Taurus Horoscope)
नोकरीत कामकाजात सुधारणा होईल. कायदेशीर बाबीकडे लक्ष दयावे लागणार आहे. ताणतणाव वाढणार नाही याची काळजी घ्या. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. कुटुंबात मनमानी करू नका. विनाकारण वाद घालू नका.
मिथुन (Gemini Horoscope)
अचानक धनलाभ होईल. अनुकुल फळ प्राप्त होतील. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता योग आहे. व्यापारीवर्गासाठी बर्याच संधी प्राप्त होतील.
कर्क (Cancer Horoscope)
अनुकुल स्थिती राहणार आहे. नोकरीत वेळेचा चांगला उपयोग करून आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. विचाराअंतीच निर्णय घ्या. व्यापारात व्यवसाय फायदेशीर राहील.
सिंह (Leo Horoscope)
कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमला या संबंधातील समस्या दूर होतील. समाजात आपली प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल.
कन्या (Virgo Horoscope)
नोकरीत कर्तुत्वाला चांगली संधी निर्माण होईल. अचानक लाभ होतील. कौटुंबिक वातावरण चांगले व आनंददायी रहिल. भाषाभ्यास ग्रंथलिखाणास उत्तम दिवस आहे. विद्याभ्यासात प्रगती राहिल.
तूळ (Libra Horoscope)
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. प्रियकराशी संबंध सुधारतील. आज तुम्हाला तुमच्या कामात राजकीय संबंधांचा लाभ मिळेल.
वृश्चिक (Scorpio Horoscope)
व्यापार रोजगारात लग्न स्थानातील भ्रमणामुळे अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्तींच्या गाठीभेठी होतील.
धनु (Sagittarius Horoscope)
नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहात. व्यापारात थोड्याफार अडचणी निर्माण होतील. प्रवासातून आज लाभ होणार आहे.
मकर (Capricorn Horoscope)
तुम्ही तुमचे नकारात्मक विचार सोडून द्यावे कारण हे तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींविरुद्ध आकर्षित करणाऱ्या चुंबकांसारखे काम करतात. अतिरिक्त पैसा रिअल इस्टेटमध्ये गुंतवावा.
कुंभ (Aquarius Horoscope)
आज तुम्ही तुमचा व्यवसाय मजबूत करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता, ज्यासाठी तुमच्या जवळच्या व्यक्तीला आर्थिक मदत करता येईल.
मीन (Pisces Horoscope)
नोकरीत ताण वाढेल. मनस्तापा सारख्या घटना घडतील. नावलौकिक प्रसिद्धिसाठी अधिक पैसा खर्च कराल. केलेल्या कामात अपेक्षेनुसार यश लागणार नाही.