राशीभविष्य

Horoscope| 'या' राशीच्या लोकांना नोकरीत पगारवाढीची शक्यता, दिवस असणार उत्साहवर्धक

Published by : Shamal Sawant

मेष (Aries Horoscope)

नातेवाईकांकडून शुभ समाचार ऐकायला मिळतील. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल. कुंटुंबासोबत तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. भावंडाच्या शुभवार्ता कळतील. नोकरीत प्रतिष्ठित, प्रसिद्ध व्यक्तीशी संबंध वाढतील. आज व्यापार वाढीच्या दृष्टीने उत्तम दिनमान आहे.

वृषभ (Taurus Horoscope)

सामाजिक मान सन्मान वाढेल. आज शनि कुंभ राशीत प्रवेश करीत आहे. परिणाम स्वरूप पुढील काळात आपल्या कार्यक्षेत्रात आर्थिक कौटुंबिक बाबतीत परिवर्तन बदल घडणार आहेत. व्यापारात एखादा मोठा व्यवहार होण्याची शक्यता आहे. आपल्याकडून वाद निर्माण होऊ शकतात.

मिथुन (Gemini Horoscope)

बोलण्यातील संभ्रम दुर ठेवा. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव राहिल. स्वतःच्या मनाने विचाराअंतीच निर्णय घ्या. यश नक्की मिळेल. आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. शासकीय कामकाजातून यश मिळेल. योजनेतून लाभ होतील.

कर्क (Cancer Horoscope)

नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न सफल होतील. मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. व्यापारात भागीदारीत कायदा होण्याचे योग आहेत. बांधकाम रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यक्तींना आज भरभरटीचा दिवस आहे.

सिंह (Leo Horoscope)

प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. मोठे पद, मानसन्मान प्रसिद्धी मिळेल. कला, साहित्य, क्रीडा या क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ चांगला होईल. व्यापारात गुंतवणूक कायदेशीर ठरेल.

कन्या (Virgo Horoscope)

नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे.आईच्या प्रकृतिकडे लक्ष द्यावे. आजचा दिवस आनंदी जाईल.

तूळ (Libra Horoscope)

नोकरीत कामाच्या ठिकाणी स्वःताला सिद्ध कराल. आपली प्रशंसा कौतुक केले जाईल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील.

वृश्चिक (Scorpio Horoscope)

अनिद्रेचा त्रास जाणवेल. मनावर संयम राखण्याचा प्रयत्न करा. नोकरीच्या ठिकाणी कामात अडचणी अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. चिंताग्रस्न मन राहील.

धनु (Sagittarius Horoscope)

जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक संकटातून जात होते त्यांना आज कुठूनही पैसे मिळू शकतात. ज्यामुळे जीवनातील अनेक समस्या क्षणार्धात दूर होतील. विचार करायला लावणारे पुस्तक वाचा आणि तुमची विचार करण्याची शक्ती सुधारा.

मकर (Capricorn Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे. तुमच्या कामाशी संबंधित कोणतेही काम तुम्ही हाती घ्याल ते नक्कीच पूर्ण होईल, परंतु तुम्ही घाई करणे टाळावे.

कुंभ (Aquarius Horoscope)

आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून आर्थिक बाबतीत चांगला पाठिंबा मिळू शकेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराला पूर्ण निष्ठेने पाठिंबा द्यावा; कुटुंबातील इतर सदस्यही तुम्हाला पाठिंबा देतील. माध्यमांशी संबंधित लोकांना अपेक्षित लाभ मिळू शकतात.

मीन (Pisces Horoscope)

आज तुमचा दिवस कामांनी भरलेला असू शकतो, पुरेशी विश्रांती घेतल्यानंतर तुम्हाला बरे वाटेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीतून आर्थिक फायदा होईल, परंतु खर्चही वाढेल. हा खर्च कुटुंब किंवा व्यवसायाशी संबंधित देखील असू शकतो.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

Operation Sindoor : मसूद अजहरच्या कुटुंबाचा अंत! "अन् कुटुंबाचे तुकडे-तुकडे झाले" जैश कमांडरचा मोठा खुलासा

Local Bodies Election Supreme Court : स्थानिक स्वराज्य निवडणुकीबाबत मोठा निर्णय, पुढच्या वर्षी होणार निवडणुक प्रक्रिया; तारीख जाहीर

Empty Stomach Eating : रिकाम्या पोटी ब्रेड खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? वाचल्यानंतर तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल...