मेष (Aries Horoscope)
आजचा दिवस कुटुंब आणि मित्रांसोबत शांततेत दिवस घालवाल असं ग्रहमान आहे. मित्रांसोबत काही जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. खूप दिवसांनी एकत्र आल्याने मन शांत होईल.
वृषभ (Taurus Horoscope)
आजचा दिवस आरोग्यदायी असेल. त्यामुळे एकदम आनंदी असाल आणि आत्मविश्वास दुणावलेला राहील. आरोग्य विषयक तक्रारींचं निवारण झाल्याने जीव भांड्यात पडेल.
मिथुन (Gemini Horoscope)
आजचा दिवस तुम्हाला संमिश्र परिणाम देणारा आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. तसेच गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळणार असल्याने आनंदी राहाल. यशाची नवी शिखरं या काळात गाठाल.
कर्क (Cancer Horoscope)
आजचा दिवस आनंदात जाईल. कुटुंबासोबत जवळच्या ठिकाणी फिरण्याचा योग जुळून येईल. भौतिक सुखांसाठी पैसे खर्च कराल. गेल्या काही दिवसांपासून असलेली इच्छा पूर्ण होईल.
सिंह (Leo Horoscope)
आजचा दिवस कठोर परिश्रम केल्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात ठेवा. दिवसभर केलेल्या मेहनतीनुसार फळ न मिळाल्याने तुम्ही अस्वस्थ व्हाल.
कन्या (Virgo Horoscope)
आज मुलाच्या करिअरमध्ये किंवा भविष्याच्या दृष्टीकोनातून व्यस्त असाल. करिअरचा पर्याय निवडण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या.
तूळ (Libra Horoscope)
आजचा दिवस तुमच्यासाठी चिंताजनक असेल असं ग्रहमान आहे. आरोग्य विषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. नवीन घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
वृश्चिक (Scorpio Horoscope)
आज आर्थिक स्तरावर कोणलाही कुठलाही शब्द देऊ नका. तुमचं नुकसान होऊ शकतं. गुप्तशत्रूंकडून एखादा सापळा रचलेला असू शकतो. जोखिम असलेली गुंतवणूक करणे किंवा इतरांना पैसे देणे टाळा.
धनु (Sagittarius Horoscope)
आजचा दिवस तुमच्यासाठी इतर दिवसांपेक्षा चांगला जाईल. समाजात तुमच्या शब्दाला मान असल्याचं दिसून येईल. कुटुंबाच्या हितासाठी ठोस पाऊल उचलू शकता. एखाद्याचं बोलणं मनाला लागू शकते.
मकर (Capricorn Horoscope)
नोकरी शोधणाऱ्या जातकांना आज नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते किंवा सध्याच्या नोकरीत पदोन्नती मिळू शकते. व्यवसाय वाढवण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. भविष्यात त्रास होऊ शकतो.
कुंभ (Aquarius Horoscope)
आजचा दिवस तुमच्यासाठी अडचणींचा ठरणार आहे. कौटुंबिक आणि व्यवसायात घडलेल्या घटनांमुळे त्रास होईल. जवळच्या व्यक्तींकडून तुमची फसवणूक होऊ शकते. आर्थिक गणित बिघडू शकते.
मीन (Pisces Horoscope)
गेल्या काही दिवसांपासून करत असलेल्या मेहनतीला अपेक्षित यश मिळेल.तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीबद्दल चांगली बातमी मिळू शकेल. तुम्हाला तुमची कौशल्ये सुधारण्यास मदत मिळेल.