राशीभविष्य

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

राशीभविष्य: व्यावसायिकांसाठी आजचा दिवस उत्तम, आर्थिक लाभ आणि नफा मिळण्याची शक्यता.

Published by : Team Lokshahi

मेष (Aries Horoscope)

बौद्धिक क्षेत्रात आपली प्रतिष्ठा उंचावेल. नोकरी रोजगारात आपले कर्तुत्व दाखवण्याची संधी मिळेल. आपल्या अंगीभूत कलागुणांना चांगले वातावरण राहिल. आध्यात्मिक व धार्मिक स्वरूपाचं लेखन होईल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. व्यवसायातील वातावरण चांगले राहिल. अचानक लाभ होण्याचे योग आहेत.

वृषभ (Taurus Horoscope)

भावंडांशी संबंध दुरावणार नाहीत याची काळजी घ्या. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे अन्यथा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरीत संघर्षाचे प्रसंग घडतील. काही बाबतीत मानसिक ताणतणाव निर्माण होतील. व्यापारात महत्वाचे निर्णय शक्यतो आज टाळावेत.

मिथुन (Gemini Horoscope)

शत्रुपक्षाचे वर्चस्व वाढेल. नोकरीत विरोधक कारवाया करयाची संधी दवडणार नाहीत. व्यापारात उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण वाढेल. अशुभ स्थानातून भ्रमण होत असल्याने देवी पाठबळ लाभणार नाही. वास्तुविषयी प्रश्न, कामे रेंगाळतील. कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्यावी.

कर्क (Cancer Horoscope)

नवीन उपक्रम हाती घ्याल. मोठ्या व्यक्तींचा सहवास लागेलचांगल्या विचारांचा लाभ होईल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकेल. संशोधनात्मक कार्य आपल्या हातून होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला फायदा होईल. आकस्मिक धनलाभ होईल.

सिंह (Leo Horoscope)

जुन्या प्रॉपर्टीचे प्रश्न आचानक निर्माण होतील. दिनमान समिश्र फलदायी ठरणारआहे. नोकरीतील वातावरण गैरसमजाचे राहिल. वरिष्ठांची नाराजी सहन करावी लागेल. वरिष्ठांकडून कामाची अपेक्षा वाढणार आहे. व्यापारात फसगत होण्याची शक्यता आहे. नवीन ओळख झालेल्या व्यक्तीवर फारसे विसंबून राहू नका.

कन्या (Virgo Horoscope)

नोकरीत कर्तुत्वाला चांगली संधी निर्माण होईल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. आपले कर्तुत्व सिद्ध झाल्याने जनमानसात प्रतिष्ठा वर्चस्व प्रस्थापित कराल. व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता आहे. नवनवीन योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या भांवडाकडून उत्तम सहकार्य लाभेल. अचानक लाभ होतील.

तूळ (Libra Horoscope)

आर्थिक उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता राहिल. दुसऱ्याला जामीन राहू नका अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता आहे. चाण्यक्यनितीचा वापर करून काही बाबतीत यश संपादन करू शकाल. व्यापार रोजगारात आर्थिक उन्नती होईल पण खर्चाचे प्रमाणही वाढेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope)

मोठ्या व मान्यवर व्यक्तींच्या गोठाभेटी होतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. नवीन जागा घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल. नोकरीत प्रशंसा केली जाईल. प्रलोभनाला मात्र बळी पडू नका. व्यापारात नवीन योजना आखाल. नवीन उपक्रम सुरू करु शकता.

धनु (Sagittarius Horoscope)

पती पत्नीमध्ये बेबनाव गैरसमज होणार नाही याविषयी काळजी घेणे योग्य ठरेल. नोकरीत खुप मेहनत घ्यावी लागेल. आपल्याविरुद्ध मात्र गैरसमज किंवा निंदानालस्ती होण्याची शक्यता आहे. मानसिक ताणतणाव वाढण्याची शक्यता राहील.

मकर (Capricorn Horoscope)

नोकरीत प्रमोशन व वेतनवाढ होण्याची शक्यता आहे. आकस्मिक लाभ होतील. विरोधकावर मात करू शकाल. आपले वर्चस्व सिद्ध कराल. व्यापारात विरोधक आक्रमक होतील. त्याचा बीमोड करण्यात यशस्वी व्हाल.आर्थिक स्थिती चांगली राहील. मित्रमैत्रिणींकडून सहकार्य मिळेल. स्विकारलेली कामे यशस्वी होतील.

कुंभ (Aquarius Horoscope)

रोजगारात स्वतःच्या विवेक बुद्धीने निर्णय घ्या. बढतीची शक्यता आहे.नवीन संधी नवीन मार्ग सापडतील. संकुचित मनोवृति टाळाजी राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना पदप्राप्ती मिळेल.आपली प्रतिष्ठा वाढीस लागेल.कामात यश आल्याने आपले मनोधर्य उंचावेल. दुर्व्यसनांपासून सावध राहा..

मीन (Pisces Horoscope)

देवधर्म व धार्मिक स्थळांना भेट दयाल. नोकरीनिमित्त दुरवरचे प्रवास घडतील. प्रवासातुन लाभ होईल. अध्यात्म क्षेत्रात रममाण होण्याची शक्यता आहे. भाग्योदय होण्याचा योग असून मान्यवर व मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभेल. आपले डावपेच यशस्वी होतील.सत्संग घडेल. व्यापारात योजना सफल होतील. घरातील कौटुंबिक वातावरण चांगले राहिल.व्यापार उद्योगात वाढ होईल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा