राशीभविष्य

Horoscope | 'या' राशीच्या लोकांचा दिवस असणार खूपच सकारात्मक, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा दिवस सकारात्मक, आर्थिक लाभ आणि नफा होण्याची शक्यता

Published by : Shamal Sawant

मेष (Aries Horoscope)

प्रयत्नांची आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल. कुटुंबातील सदस्याच्या आजारपणाने त्रासुन जाल. खर्च वाढणार आहे. खर्चाने मन व्यथित होईल. चिडचिडेपणा वाढू शकतो.

वृषभ (Taurus Horoscope)

नोकरीत बदल किंवा बढतीचे प्रबल योग आहेत. नोकरीत नियोजित कामे वेळेवर कराल. नवनवीन कल्पना आमलात आणाल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल.

मिथुन (Gemini Horoscope)

व्यापारात भागीदारीत नवीन योजनेस प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. नोकरीत कर्तुत्वाला चांगली संधी निर्माण होईल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील.

कर्क (Cancer Horoscope)

नोकरीत अतिउत्साहीपणा टाळा. मानसिक स्वास्थ सांभाळा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. साकारात्मक दृष्टीकोन ठेवून वाटचाल करावी.

सिंह (Leo Horoscope)

तुमची पदोन्नती आणि प्रगती होईल. आपणास मेहनतीनुसार चांगल्या फलांची प्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. प्रगतीकारक काळ आहे.

कन्या (Virgo Horoscope)

आर्थिक स्थिती चांगली राहिल. व्यवसायिकांना नफ्यात वाढ होईल. गृहसौख्य उत्तम राहील. दिवसभर मन प्रसन्न असेल.

तूळ (Libra Horoscope)

व्यापारात बदल प्रगती घडविणारे ठरतील. नोकरदार वर्ग कलाकारांना प्रसिद्धीबरोबर यश मिळवून देणारा योग आहे. केलेल्या कष्टाचे चीज होईल. अचानक आर्थिक लाभ मिळेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope)

नवीन प्रकल्प कामे मिळतील. मनातील अहंकाराची भावना टाळावी. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल.

धनु (Sagittarius Horoscope)

नोकरीत स्थान बदलाची उत्तम संधी आहे. प्रमोशनचे योग आहेत. आजचा दिवस सफलतापूर्वक असणार आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल.

मकर (Capricorn Horoscope)

कलाकारांसाठी उत्तम दिवस आहे.आर्थिक स्थिती चांगली राहिल. व्यवसायिकांना नफ्यात वाढ होईल. गृहसौख्य उत्तम राहील. दिवसभर मन प्रसन्न असेल.

कुंभ (Aquarius Horoscope)

व्यवसाय रोजगारात उच्च ज्ञान किंवा नवे तंत्रज्ञान अंत्यत फायदेशीर ठरेल. महिला वर्गाना विशेष प्रगतीचा टप्पा गाठता येईल. कौटुंबिक पातळीवर समाधानी रहाल.

मीन (Pisces Horoscope)

सामाजिक कार्यात मान सम्मान वाढेल. गृहसौख्यात उत्तम संयोग राहील. प्रसन्नतापूर्ण आणि मन आंनदी राहील.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Periods Delaying Pills : धक्कादायक! मासिक पाळी थांबवण्यासाठी गोळ्या खाणं जीवावर बेतलं; तरुणीचा मृत्यू

Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सवावर सीसीटीव्हीची करडी नजर; 15 हजार पोलिसांचा बंदोबस्त

Latest Marathi News Update live : मुंबईच्या राज्याचे प्रथम दर्शन

Mumbai cha Raja 2025 : मुंबईच्या राज्याचे प्रथम दर्शन