Latest Marathi News Update live  
Lokshahi LIVE Blog

Latest Marathi News Update live : पुण्यात उद्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक होणार

Marathi Live Headlines Updates: आज सोमवार, दिनांक 19 जानेवारी 2026, राज्यातील थंडी, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..

Varsha Bhasmare

Banjara community : बंजारा समाजाचा इशारा : ST आरक्षणावर निर्णय नाही तर आझाद मैदानावर मोठे आंदोलन

हैदराबाद गॅझेटनुसार नूसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे (ST) आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून बंजारा समाजाने सातत्याने आंदोलन केले. विविध ठिकाणी मोठे मोर्चे काढण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र सरकारने हिवाळी अधिवेशन व नगराध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांचा कालावधी दिला होता; मात्र हा कालावधी संपूनही निर्णय झालेला नाही. याच्या निषेधार्थ 18 जानेवारी रोजी संभाजीनगर येथील संत सेवालाल महाराज मंदिरात बंजारा युवकांची बैठक झाली. सरकारने तात्काळ निर्णय न घेतल्यास मुंबईतील आझाद मैदानावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

Uday Samant : ‘महायुतीचा महापौर ठरला की काही लोक नॉट रिचेबल असतील’; उदय सामंत यांचे सूचक विधान

मुंबई महानगरपालिकेतील महापौर पदाच्या निवडीपूर्वीच राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, मंत्री उदय सामंत यांच्या सूचक वक्तव्यामुळे नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. “महायुतीचा महापौर ठरला, की काही लोक नॉट रिचेबल असतील,” असे विधान करत सामंत यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर निशाणा साधला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मुंबईच्या राजकारणात नेमका कोण ‘नॉट रिचेबल’ होणार, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. सध्या महापालिकेतील सत्तास्थापनेसाठी महायुतीकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काही नगरसेवकांना मुंबईतील नामांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. यावर भाष्य करताना उदय सामंत म्हणाले, “नगरसेवक हॉटेलमध्ये आहेत, याचा अर्थ काही तरी वेगळंच चाललंय असा फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात कोणतंही गैर नाही. आमचे नगरसेवक सुरक्षित आहेत आणि पक्षाच्या संपर्कात आहेत.”

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जळगाव महामार्गावर तरुणांची हुल्लडबाजी

(Chhatrapati Sambhajinagar) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जळगाव महामार्गावर तरुणांकडून हुल्लडबाजी करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. जळगाव महामार्गावरील फुलंब्री-सिल्लोड रस्त्यावर हुल्लडबाजी करत वाहतुकीस अडथळा निर्माण करण्यात आला. बैलगाडी आणि दुचाकी रस्त्यात आणून तरुणांनी गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले. तरुणांच्या रात्रीच्या या गोंधळामुळे महामार्गावर अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हुल्लडबाज करणाऱ्या तरुणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.

ShivSena : ‘धनुष्यबाण’ कोणाचा? शिवसेना वादावर न्यायालयाचा लवकरच अंतिम फैसला

शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह कोणाच्या मालकीचे, याबाबतचा बहुचर्चित वाद आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. येत्या बुधवारपासून सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची अंतिम सुनावणी सुरू होणार असून, सलग दोन दिवस युक्तिवाद ऐकून घेतले जाणार आहेत. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ या ऐतिहासिक प्रकरणावर सुनावणी घेणार आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या सुनावणीदरम्यानच न्यायालयाने अंतिम सुनावणीचा संकेत दिला होता. त्यामुळे आता या प्रकरणावर लवकरच निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mumbai Municipal Election : मुंबई महापालिकेत भाजपचा दबदबा; सर्वाधिक जागा जिंकून भाजपचा स्ट्राईक रेट अव्वल...

राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने दमदार कामगिरी करत सर्वात मोठा पक्ष म्हणून आपली सत्ता सिद्ध केली आहे. भाजपने केवळ सर्वाधिक जागा जिंकल्या नाहीत, तर स्ट्राईक रेटच्या बाबतीतही सर्व पक्षांना मागे टाकले आहे. मुंबईत भाजपने 135 जागा लढवल्या असून, त्यापैकी तब्बल 89 जागांवर विजय मिळवला आहे. म्हणजेच भाजपचा यशाचा स्ट्राईक रेट तब्बल 66 टक्के इतका राहिला आहे. या निकालामुळे मुंबईच्या राजकारणात भाजपची ताकद अधिक ठळकपणे समोर आली आहे. महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्येच्या जवळ भाजप पोहोचला असून, महायुतीच्या माध्यमातून सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. भाजपची ही कामगिरी संघटनात्मक ताकद, प्रभावी प्रचार आणि उमेदवार निवडीचा परिणाम असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Weather Update : थंडी पुन्हा सक्रिय! राज्यात शीतलहरीचा इशारा, किमान तापमानात मोठी घसरण

मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी अनुभवायला मिळत असताना, महाराष्ट्रात मात्र काही काळ थंडी कमी झाल्याचे जाणवत होते. मात्र आता भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यासाठी शीतलहरीचा मोठा इशारा दिला असून, येत्या काही दिवसांत थंडी पुन्हा जोर धरू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये किमान तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण होण्याची शक्यता आहे. विशेषतः धुळे जिल्ह्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून, येथे 9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. गोंदिया येथे 9.8 अंश, तर यवतमाळ आणि परभणी येथे 10 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. यामुळे सकाळी आणि रात्री नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे.

Bihar Bhawan : मुंबईत उभारणार बिहार भवन, भाजप-जेडीयू सरकारचा निर्णय

मुंबईत लवकरच 30 मजली ‘बिहार भवन’ उभे राहणार असून, बिहारमधील भाजप-जेडीयू सरकारने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला प्रशासकीय आणि आर्थिक मंजुरी दिली आहे. महाराष्ट्रात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच बिहार सरकारने घेतलेला हा निर्णय राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या प्रकल्पासाठी तब्बल 314 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. बिहारमध्ये सध्या भाजप आणि जनता दल (युनायटेड) यांची सत्ता असून, नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुंबईतील बिहार भवन प्रकल्पाला हिरवा कंदील देण्यात आला. हे भवन मुंबई पोर्ट ट्रस्टच्या हद्दीतील एल्फिन्स्टन इस्टेट परिसरात उभारण्यात येणार आहे. सुमारे 0.68 एकर जागेवर 30 मजली इमारत उभी राहणार असून, ही इमारत मुंबईतील बिहारी नागरिकांसाठी महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.


f

Iran Protest : महागाईच्या विरोधात इराणमध्ये संघर्ष; आतापर्यंत 5 हजार जणांचा मृत्यू, इराण सरकारचा दावा

(Iran Protest) महागाईच्या विरोधात इराणमध्ये संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. वाढत असलेल्या महागाईच्या मुद्द्यावर इराणमध्ये निदर्शने सुरू केली आहेत. 28 डिसेंबर रोजी इराणमध्ये ही निदर्शने सुरू झाली. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी अमेरिका आणि इस्रायलवर ही अस्थिरता पसरवण्याचा आरोप केला आहे. याच पार्श्वभूमीवर इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून जे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.या आंदोलनादरम्यान आतापर्यंत सुमारे 500 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह किमान 5 हजार लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती या भागातील एका इराणी अधिकार्‍याने दिल्याची माहिती मिळत आहे. यातच या संघर्षात हजारो लोकांचा मृत्यू झाल्याचेही इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी मान्य केले आहे.

Elphinstone Bridge : एल्फिन्स्टनचा नवा पूल सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणार...

मुंबईतील पश्चिम आणि मध्य रेल्वेला जोडणारा महत्त्वाचा एल्फिन्स्टन पूल अखेर नव्या रूपात उभा राहण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या समन्वयातून सुरू असलेले या पुलाचे काम सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. याचबरोबर, सध्या वापरात नसलेल्या ब्रिटीशकालीन जुन्या पुलाचा सांगाडा पुढील दोन महिन्यांत हटवण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.


एल्फिन्स्टन पूल हा परळ, दादर आणि लोअर परळ परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. दररोज लाखो प्रवासी आणि वाहनचालक या मार्गाचा वापर करतात. जुना पूल धोकादायक अवस्थेत गेल्यानंतर तो बंद करण्यात आला होता. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, प्रवाशांची गैरसोय आणि स्थानिक नागरिकांचे हाल होत होते. या पार्श्वभूमीवर नवीन पुलाच्या कामाला गती देण्यात आली आहे.

Agriculture News : शेतकऱ्यांना दिलासा! १७ लाख शेतकऱ्यांच्या कर्जावर केंद्राचा मोठा निर्णय

महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. राज्यातील तब्बल 17 लाख 29 हजार शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची पुनर्रचना करण्यास केंद्राने मान्यता दिली आहे. या अंतर्गत एकूण 26 हजार 658 कोटी 77 लाख रुपयांचे कर्ज पुनर्रचित करण्यात येणार असून, यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.

Board Exams 2026 : दहावी–बारावी परीक्षांमध्ये कडक बंदोबस्त; प्रत्येक वर्गात CCTV अनिवार्य

राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शिक्षण मंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदापासून प्रत्येक परीक्षा केंद्रातील प्रत्येक खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता येणार असून, कॉपी, गोंधळ किंवा इतर अनुचित प्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) माहितीनुसार, बारावीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार आहे. त्यापूर्वी, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2026 दरम्यान पार पडणार आहेत. दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रकही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

Thane BJP : 'शीळ ते वडवली भाजपा वाढवली' ठाण्यात भाजपाची बॅनरबाजी

(Thane BJP) ठाणे पालिकेत सत्ता स्थापनेला वेग आल्याचे पाहायला मिळत असून भाजपाकडून मोर्चेबांधणी करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर ⁠भाजपकडून ठाण्यात बॅनर लावण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.⁠ठाण्यात भाजपाची ताकत वाढल्याचा भाजपाने केला दावा करत 'शीळ ते वडवली भाजपा वाढवली' असे लिहिलेले बॅनर ठाण्यात लावण्यात आले आहे. यासोबतच 'भाजपला 2 वर्ष महापौरपद पाहिजे नाहीतर, विरोधात बसायला तयार' अशी भाजपा आमदार निरंजन डावखरे यांची स्पष्ट भूमिका असल्याची माहिती मिळत आहे.

BJP : 'पुढील आठ दिवस मुंबईबाहेर जाऊ नका'; भाजपकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना

(BJP ) मुंबई महानगर पालिका निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.29 महानगरपालिकांमध्ये भाजपा-शिवसेनेच्या महायुतीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. मुंबई महानगर पालिका निवडणुकीचा निकाल हाती आला असून यामध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. महापालिका निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून 29 पैकी 24 पालिकांवर महायुतीची सत्ता आल्याचे पाहायला मिळत आहे.भाजपने जवळपास ९ महापालिकांमध्ये स्वबळावर सत्ता गाठली. २९ पैकी ९ महापालिका भाजपने स्वबळावर जिंकल्या असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Kurla : कुर्ल्यात भाजप कार्यकर्त्यांवर फेरीवाल्यांचा हल्ला

(Kurla ) कुर्ल्यात भाजप कार्यकर्त्यांवर फेरीवाल्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. आकाश सिंग, आदित्य पानसे, असीम सिंग यांच्यावर फेरीवाल्यांनी मिळून प्राणघातक हल्ला केल्याची माहिती मिळत असून या हल्ल्यात आकाश सिंग यांच्या डोक्यावर थेट वार करण्यात आला असून धारदार शस्त्रांनीही हल्ला झाला आहे. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आदित्य पानसे व असीम सिंग यांनाही मारहाण करण्यात आली आहे. दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत असून या घटनेनंतर संतप्त सकल हिंदू समाजाने कुर्ला पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले.

Beed : बीडच्या माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश शुगर कारखाना बनला प्रदुषणाचा कहर...!

बीडच्या माजलगांव तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश शुगरच्या प्रदूषणामुळे खरात आडगावसह परिसर धोक्यात आला आहे. पवारवाडी येथील जय महेश शुगर इंडस्ट्रीज (एन.एस.एल.) लि. कडून होत असलेल्या धूर, काजळी व सांडपाण्यामुळे शेती, पाणी आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप केला आहे.या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सचिन शेजुळ यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, क्षेत्रीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर तसेच पर्यावरण मंत्र्यांकडे लेखी तक्रार सादर केली आहे.काजळीमुळे पिकांचे नुकसान, सांडपाण्यामुळे विहिरी दूषित, तर नागरिकांना श्वसन व डोळ्यांचे विकार होत असल्याचे निवेदनात नमूद आहे. MPCB ने तातडीने पाहणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन शेजुळ यांनी केली आहे.

Maharashtra Politics : मुख्यमंत्र्यांच्या डावोस दौऱ्यामुळे महापौर पदाचा तिढा कायम

राज्यातील सर्व महापालिकांमध्ये महापौर पदाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली असताना, महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत लांबणीवर पडल्याने राजकीय वातावरण अधिक तापले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री यांच्या डावोस दौऱ्यानंतरच सर्व महापालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेला महापौर पदाचा तिढा काही काळ कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात मुंबईसह अनेक महापालिकांमध्ये निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असले, तरी महापौर कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित असणार याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. याच कारणामुळे सत्तास्थापन, आघाड्या-युती, तसेच अंतर्गत रस्सीखेच यांना पूर्णविराम मिळालेला नाही. आता मुख्यमंत्री डावोस दौऱ्यावर असल्याने, त्यांच्या परतीनंतरच या प्रक्रियेला गती मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

Sambhajinagar: छ.संभाजीनगरमध्ये शिवसेना-भाजपची आज बैठक

जिल्हा परिषद निवडणुकीची जय्यत तयारी

भाजप-शिवसेना युतीबाबत दुपारी 4 वाजता बैठक

महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना युती झाली नाही, मात्र आता पक्षाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे युतीवर ठाम असल्याची माहिती भाजप आमदार संजय केनेकरांनी दिली...

Nashik: नाशिक जिल्हा रुग्णालयातील आवारात पोलिसांकडून वकिलाला मारहाण

* जिल्हा रुग्णालय आवारात पोलिसांकडून वकिलाला मारहाण...

* वकिलाला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप

* जिल्हा न्यायालय बाहेर वकील संघटना कडून निदर्शने

* पोलिसाला निलंबित करून तत्काळ अटक करण्याची मागणी

* अँड तुषार दोंदे यांना सिविल हॉस्पिटल आवारात मारहाण

* आत्महत्या झालेल्या पक्षकाराची बाजू ऐकून घेण्यासाठी गेले होते जिल्हा रुग्णालयात

Navi Mumbai: नवी मुंबईतील उरण-जेएनपीटी मार्गावर ऑइल चोरीचा सुळसुळाट

नवी मुंबईतील जेएनपीए (नाव्हा शेवा) बंदरात कंटेनरमधील मालचोरीचा गंभीर प्रकार समोर आला असून यामागे संघटित टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कंटेनर तपासणीदरम्यानच काही लोकांच्या संगनमताने मौल्यवान माल लंपास केला जात असल्याची माहिती पुढे येत आहे.

देशातील महत्त्वाच्या बंदरातून दररोज मोठ्या प्रमाणावर आयात-निर्यात होत असताना अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने बंदरातील सुरक्षा व अंतर्गत यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

डोंबिवलीतील देसलेपाडा परिसरात दुकानाबाहेर भंगार ठेवल्याच्या कारणावरुन वाद

डोंबिवली देसलेपाडा परिसरात भंगार दुकानाबाहेर भंगार ठेवल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून भंगार व्यवसायिकाला मुलासह लाकडी दांडक्याने मारहाण झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पंकज मौर्या व त्यांचे वडील विनोद मौर्या यांनी सागर कोटकर व त्याच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी व्यक्तीविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

EVM जिंदाबाद अस मोठ्या अक्षरात लिहित कोल्हापुरात झळकले बॅनर

EVM जिंदाबाद अस मोठ्या अक्षरात लिहित कोल्हापुरात झळकले बॅनर

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्याकडून बॅनरबाजी

ऐतिहासिक दसरा चौकात झळकलेल्या बॅनरची सर्वत्र चर्चा

बॅनर वरील मजकूर ठरतोय चर्चेचा विषय

माजी खासदार तथा भाजप नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा धमकी

माजी खासदार तथा भाजप नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा धमकी........

पोलिसांच्या डायल 112 क्रमांकावर अज्ञात व्यक्तींनी फोन करून दिली जीवे मारण्याची धमकी......

काही दिवसापूर्वी मुलांना जन्म घालण्यासंदर्भात माजी खासदार नवनीत राणा यांनी वक्तव्य केलं होतं....

बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू असा पोलिसांना 112 नंबर वर फोन आला

या संदर्भात नवनीत राणा यांचे खाजगी स्वीय सहाय्यक सचिन सोनोने यांनी राजापेठ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली

पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध राजापेठ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला

पुण्यात मनसेचे उमेदवार राम बोरकरांविरोधात गुन्हा दाखल

पुणे महापालिका निवडणुकीसाठी उभे असलेले मनसे चे उमेदवार राम बोरकर यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात प्रभाग २९, ३० आणि ३२ याची मतमोजणी दीनदयाल शाळेत करण्यात आली होती. यावेळी मनसे चे राम बोरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना धमकावणे आणि सरकारी कामात अडथळा आणला होता. या विरोधात निवडणुक निर्णय अधिकारी यांनी अलंकार पोलिस ठाण्यात राम बोरकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. प्रभाग २९ मधून राम बोरकर हे मनसेचे उमेदवार होते.

Pune: पुण्यात उद्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक होणार

उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता काँग्रेस भवन मध्ये होणार बैठक...

पुणे महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे 15 नगरसेवक निवडून आलेले आहेत...

2017 पेक्षा आता झालेल्या निवडणुकीत काँग्रेसची नगरसेवकांची संख्या वाढली...

बैठकीत गटनेता निवडीवर होणार चर्चा…

गडचिरोलीकडून आरमोरीकडे जात असलेल्या एसटी बसला खासगी बसची धडक

गडचिरोलीकडून आरमोरीकडे जात असलेल्या एसटी बसला एका खासगी ट्रॅव्हल्स बसने मागून धडक दिली. ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाल्याचे समजते. यात खासगी बसमधील 20 प्रवासी जखमी झाले. आरमोरी पोलिसांनी चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा