Pune: पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी हालचाली
अजित पवारांची अमोल कोल्हे आणि रोहित पवारांसोबत आणखी एक गुप्त बैठक. पुण्याच्या बंगल्यात दुपारी दोन तास चर्चा, मात्र अद्याप शिक्कामोर्तब नाहीच. बैठक झाली, याला दोन्ही बाजूंनी दुजोरा दिला गेला
दापोली येथे पर्यटनासाठी आलेल्या तेरा वर्षीय मुलीचा मृत्यू. एकुलती एक लाडक्या सुकन्येचा मृत्यू. आंचल मदन सकपाळ वय वर्ष १३ असे या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. मुंबई कल्याण परिसरातून हे कुटुंब 25 डिसेंबर रोजी दापोली येथे पर्यटनासाठी आले होते.
पुण्यात अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील युतीच्या चर्चेला वेग आला. रात्री उशिरा अजित पवार यांच्याकडून शिवसेनेच्या एका नेत्याला फोन आज दोन्ही पक्षातील महत्वाच्या व्यक्तींची भेट होण्याची शक्यता...
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शाखाप्रमुख ते विभाग प्रमुख महिला पुरुष पदाधिकारी यांची बैठक शिवसेना भवन येथे बैठक झाली. मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या दृष्टीने महत्त्वाची चर्चा होणार तसेच एबी फॉर्म उद्या देण्यात येणार आहेत. आज दुपारी १२ च्या दरम्यान बैठकीला उद्धव ठाकरे शिवसेना भवनात दाखल होणार
चंद्रपूर,महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी पाच नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. तर २५१ नामनिर्देशनपत्रांची उचल करण्यात आली. नामनिर्देशनपत्र सादर करण्यासाठी आता शेवटचे दोन दिवस शिल्लक आहे. दरम्यान, प्रमुख राजकीय पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी सावध भूमिका घेतली आहे.
सुमारे सव्वापाच कोटी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी आलेल्या तिघांना कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने डमी ग्राहक पाठवत पाठलाग करून अटक केली.
तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील रेल्वे फाटक क्रमांक ५३२ हे सलग दोन महिने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यासंदर्भातील पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाने देव्हाडी ग्रामपंचायतीला पाठविले आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या जागा वाटपाबद्दल गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या बैठका आणि वाटाघाटीनंतर अखेर शिवसेना भाजपा महायुतीचा फॉर्मुला आज ठरला. शिवसेनेला 67 आणि भाजपाला 54 जागा मिळाल्या मात्र कल्याण पूर्वेला अवघ्या सात जागा मिळालेल्या भाजप कार्यकर्ते नाराज झाले.
पुणे महानगरपालिका निवडणुकीत आता वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री. वंचित बहुजन आघाडी पुणे महानगरपालिकेच्या सर्व 165 जागा लढवणार. वंचित बहुजन आघाडीची माहिती कुठल्याही पक्षासोबत युती न करता वंचित बहुजन आघाडी पुणे महापालिकेत स्वबळावर लढणार
तुलिंज पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कारवाई करत ३७ वर्षीय नायजेरियन नागरिकाला अटक केली आहे. आरोपीकडून ६२ ग्रॅम एमडी (मॅफेड्रोन) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत १२ लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर असून त्यांनी नेहमीप्रमाणे भल्या पहाटे पाच वाजताच विकासकामांची पाहणी सुरू केली. विविध विकासकामांचा आढावा घेत असताना एका ठिकाणी स्ट्रीट फूडसाठी उभारण्यात आलेल्या शॉप्सची त्यांनी पाहणी केली.
ठाकरे बंधूंकडून राष्ट्रवादीला मुंबईत केवळ 16 जागांचा प्रस्ताव...मातोश्रीवरील जयंत पाटील आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत फॉर्मुल्यावर चर्चा...
छत्रपती संभाजीनगरात रशीद मामू यांच्याकडून पोलिसात तक्रार दाखल केली. सोशल मीडियावर बदनामीची रशीद मामूंची पोलिसांत तक्रार दिली. सोशल मीडियावर आपली बदनामी होत असल्याच्या आरोपासह माजी महापौर रशीद मामू यांनी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली आहे. काही राजकीय पक्ष हिंदू–मुस्लीम असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असून, उद्धवसेनेत प्रवेश केल्यापासून आपल्याविरोधात खालच्या पातळीवरील आरोप केले जात असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
इंदापूर मध्ये कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते इंदापूर नगर परिषदेत विजयी उमेदवारांचा जाहीर नागरी सत्कार समारंभ पार पडला. यावेळी नवनिर्वाचित १४ नगरसेवकांसह नवनिर्वाचित नगराध्यक्ष भरत शहा यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मतदार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागपूर मतदान जनजागृतीसाठी शहरात 335 ठिकाणी जागरूकता फलक लावण्यात आले. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी नागपूर महापालिकेकडून मतदार जागृती शहरातील 335 ठिकाणी लावले जाणार जागरूकता फलक यासाठी 335 स्थळ निश्चित करण्यात आली.
बीडच्या नेकनूर येथे भर रस्त्यावर दोन गटात मारामाऱ्या झाल्या यामध्ये दोन्ही गटातील काही लोक जखमी झाले आहेत.. यामुळे नेकनूर गावामध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.. दरम्यान ही मारामारी सुरू होण्यापूर्वी हातात लाकडी दांडके व इतर काही वस्तू घेऊन जाताना काही लोक दिसत आहेत
सांगलीच्या राजकारणात आता माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे पणतू आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री यांचे सुपुत्र व खासदार विशाल पाटलांचे पुतणे हर्षवर्धन पाटलांची एंट्री झाली आहे.हर्षवर्धन पाटील हे आता सांगली महापालिका निवडणूक लढवणार आहेत.हर्षवर्धन पाटील हे प्रतीक पाटील यांचे मोठे चिरंजीव आहेत.पुणे एमआयटी मधून शिक्षण घेत थेट इंग्लंड मधून एमएस शिक्षण पूर्ण करून हर्षवर्धन पाटील आता थेट सांगलीच्या राजकीय आखाड्यात उतरले आहेत.
दुरुस्ती आणि सहाव्या मार्गिकेच्या कामांसाठी आज विशेष कालावधीत ब्लॉक घेण्यात आला आहे माटुंगा ते मुलुंड दरम्यान आप आणि डाऊन फास्ट मार्गावर हा ब्लॉक असेल तर सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवर कांदिवली ते बोरिवली दरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे हार्बर मार्गावर देखील देखभाल दुरुस्तीची काम करण्यात येणार असल्याने ब्लॉक घेण्यात आला आहे तसेच एकूण ३३३ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत
अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत २५ जणांनी आपले नामांकन दाखल केले आहे. अर्ज भरण्यासाठी आता केवळ दोन दिवस शिल्लक आहेत.आज रविवार हा साप्ताहिक सुटीचा दिवस असल्याने निवडणूक प्रक्रिया थांबेल. त्यामुळे उमेदवारांना आता २९ आणि ३० डिसेंबर हे दोनच दिवस अर्ज दाखल करण्यासाठी उपलब्ध आहेत.
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत आतापर्यंत १८१६ इच्छुक उमेदवारांनी अर्ज नेले असून केवळ २८ जणांनीच उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उद्या सोमवारी आणि मंगळवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारी दाखल करण्यासाठी झुंबड उडणार आहे. कोऱ्या अर्जाचा विचार करता सरासरी २२ अर्ज एका जागेसाठी नेले असल्याचे दिसते.
बांगलादेशी महिलांना पुण्यातून देहविक्री साठी कॉन्ट्रॅक्टर आणणारे रॅकेट नाशिक पोलिसांनी उघडकीस आणले आहे .नाशिकच्या पांडवलेणी जवळ कवठेकर वाडीत एटीएस आणि इंदिरानगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे .
अमरावती महानगरपालिकेच्या जागा वाटपा संदर्भात दुपारी नागपुर येथे शिवसेना शिंदे गट,भाजप, युवा स्वाभिमान संघटनेची होणार एकत्रित फायनल बैठक. चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने अमरावतीच्या स्थानिक भाजप, शिंदे गट आणि युवा स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांना नागपूर मध्ये बैठकीसाठी बोलावलं...
पुणे महानगरपालिकेत धनगर समाजाला डावल तर मतदानावर बहिष्कार टाकू यशवंत सेनेने इशारा दिला आहे. अनेक प्रभागांमध्ये धनगर समाजाचे वर्चस्व आहे त्या ठिकाणी पाच जागा धनगर समाजाला देण्यात याव्यात अशी मागणी यशवंत सेनेचे अध्यक्ष विष्णू कुराडे यांनी पत्रकार परिषदेत केली.
पुणे महानगरपालिका निवडणुकीत आता वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री. वंचित बहुजन आघाडी पुणे महानगरपालिकेच्या सर्व 165 जागा लढवणार, वंचित बहुजन आघाडीची माहिती दिली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या बैठकीला शरद पवार उपस्थित राहिले नाहीत. शरद पवार पक्षाचे स्थानिक नेतेही गैरहजर होते. एका अज्ञात ठिकाणी काँग्रेस आणि ठाकरे गटाची बैठक सुरू असून, आता प्रश्न निर्माण झाला आहे की, शरद पवार गट पुन्हा राष्ट्रवादीसोबत जाईल का.
मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप–शिवसेना युतीचा तिढा अधिकच वाढताना दिसत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपाला थेट २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. ठरलेल्या वेळेत युतीबाबत स्पष्ट निर्णय न झाल्यास आम्ही आमचा स्वतंत्र निर्णय घेऊ, असा इशारा त्यांनी दिला.
येत्या तीन तारखेला अथवा दहा तारखेला ठाकरे बंधूंची एकत्र ठाण्यातील गावदेवी मैदान किंवा गडकरी रंगायतन येथील चौकात प्रचार सभा होण्याची शक्यता..
प्रथमच ठाकरे बंधू ठाणे शहरात एकच मंचावर आगामी महापालिका निवडणुकीमध्ये येत असल्याने ठाण्यात जोरदार दोन्ही पक्षांकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे...
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. या निवडणुकीच्या दृष्टीने अनेक पक्ष प्रवेश होताना दिसत आहेत. दरम्यान, मुंबईत महायुतीत दोस्टी कुस्ती होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईत मोठा धक्का बसला आहे.
पिंपरी चिंचवड शहरात महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या आधीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीने प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसतंय उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधीच आपल्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री अजित पवार करतायेत