तेजस्वी घोसाळकर भाजपकडून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळत आहे. वॉर्ड क्रमांक 2 मधून तेजस्वी घोसाळकर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाकडून आज शहरातील पहिला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. प्रभाग क्रमांक २४ मधील उमेदवार व निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांचा अर्ज आज दाखल होणार आहे.
१९४ वाॅर्डची उमेदवारी आमदार सुनिल शिंदे यांच्या भावाला देत असल्यामुळे प्रभादेवी येथील शिवसेना उबाठा मध्ये नाराजी आली. सुनिल शिंदे यांच्या भावाला जर उमेदवारी दिली तर १९४ बंड करू अशी भुमिका बैठकीत शिवसेनेना उबाठा पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे
एकीकडे कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याची शेतकरी ओरड करीत असताना दुसरीकडे मात्र मनमाड,मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठया प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड केली जात आहे..
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
माजी नगरसेविका शीतल गंभीर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक १९०मधून भाजप कडून शीतल गंभीर यांना उमेदवारी दिली.
भिवंडी पालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली .परंतु अजून निवडणूक प्रचाराची रंगत चढणे बाकी असतानाच,भिवंडीत आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी माजी महापौर विलास पाटील,त्यांचा मुलगा मयुरेश पाटील व इतर तीन जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
पुण्यात अजित पवार यांच्या जिजाई या निवासस्थानी बैठक. बैठकीला पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व स्थानिक नेते उपस्थित असून पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता
सोलापूर महानगरपालिका निवडणूक रणधुमाळी सुरु असून अर्ज भरण्यासाठी विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांची धावपळ केली आहे. मविआकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. भाजपकडून अनेक नेत्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. एबी फॉर्म मिळण्यासाठी करावी लागणार प्रतीक्षा..
सोनाली सावंत या भाजप वरळी संयोजक दीपक सावंत यांच्या पत्नी
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात सावंत यांच्या कामगिरीकडे असेल लक्ष
भाजपचे धनंजय जाधव अजित पवार यांच्या भेटीला
राष्ट्रवादीत करणार प्रवेश
भाजपने उमेदवारी न दिल्याने धनंजय जाधव यांच्या डोळ्यात अश्रू
राजेश कांगणे प्रभाग 195 मधून लढणार निवडणूक
अग्निशमन दल कर्मचारी संघटनेचे ही कांगणेंनी केलंय प्रतिनिधित्व
नांदेडमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
शिवसेनेचे माजी नगरसेवक व विधानसभा प्रमुख अशोक उमरेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत आज आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पक्षात प्रवेश केला आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला असल्याच पहायला मिळत आहे..
प्रभाग क्रमांक १० मधून भरला उमेदवारी अर्ज
जितेंद्र पटेल हे भाजपचे माजी नगरसेवक
भाजपकडून पटेल यांना पुन्हा संधी
जळगाव महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाच्या पहिल्या 4 उमेदवारांचे अर्ज दाखल
शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारांनी केले अर्ज दाखल
महायुतीच्या घोषणेआधीच शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात
भाजप शिवसेनेची युती निश्चित असल्याची आमदार किशोर पाटील यांची माहिती
भाजप शिवसेना 50/25 जागांचा फॉर्मुला ठरलेला त्यामुळे 25 जागांवर शिवसेना शिंदे गट ठाम
राष्ट्रवादी अजित पवार गट युतीत सहभागी झाल्यात भाजपच्या कोट्यातून जागा दिल्या जाणार असल्याचे किशोर पाटलांचे संकेत
बीडच्या वडवणीत गट नंबर 656 गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या तलाठी गौतम वडमारे यांना जाती वाचक शिवीगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी 08 आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेतील आरोपी पोलिसांनी अद्याप अटक न केल्याने 24 डिसेंबर पासून वडवणी साहाय्यक महसूल प्रशासनाने काम बंद आंदोलन सुरू ठेवले असून तहसील कार्यासमोर अधिकारी तलाठी यांनी ठिय्या मांडला आहे.
नवी मुंबई महायुती तुटण्याच्या मार्गावर
अदयाप जागा वाटप न झाल्याने महायुतीच्या सर्व पक्षांनी आपापल्या उमेदवाराला अर्ज दाखल करण्यास सांगीतले आहे..
प्रत्येक पक्ष आपपल्या उमेदवाराला एबी फॉर्म देतोय
नेत्रा शिर्के यांना वॉर्ड 25 मधून भाजपाकडून उमेदवारी
वॉर्ड क्रमांक 192मधून उमेदवारी
मला संधी मिला याचा आनंद-किल्लेदार
मी 100 टक्के जिंकणार-यशवंत किल्लेदार
सरचिटणीस पदाचा दिला राजीनामा
यशवंत किल्लेदारांना उमेदवारी दिल्याने नाराज
उमेदवारीसाठी राज ठाकरे यांच्याकडे वारंवार विनवणी केली होती
भाजपचे धनंजय जाधव यांनी केला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
भाजपने उमेदवारी न दिल्याने धनंजय जाधव यांच्या डोळ्यात अश्रू
प्रभाग क्रमांक २७ मधून होते इच्छुक
प्रबळ दावेदार असताना ही मला तिकीट दिले नाही ,मान्यवर अन्याय झाला आहे, ज्याला कुणी ओळखत नाही त्याला पक्षाने तिकीट दिले भाजपमध्ये निष्टवंत मध्ये अन्याय होत असेल तर गप्प बसणार नाही
मनपा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने पक्षाला रामराम
कैलास शिंदे, मनोज चौधरींनी दिला उपशहर प्रमुख पदाचा राजीनामा
'राजकारणात निष्ठा नाही, आर्थिक क्षमता हाच निकष'
मनोज चौधरींचा आरोप
सांगली महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट स्वबळावर लढणार असल्याची घोषणा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. सांगलीत भाजपासोबत असलेली युती तुटल्याचे स्पष्ट झाले असून, भाजपने शिंदे गटाला सन्मान न दिल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपने आमची ताकद कमी लेखली असून येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आपली ताकद दाखवून देईल, असा इशाराही देसाईंनी दिला आहे. या निवडणुकीकडे ते स्वतः लक्ष देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपमधील जागावाटपाचा तिढा अधिकच वाढला आहे. भाजपकडून सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यामुळे शिवसेनेने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे पर्याय म्हणून प्रस्ताव दिला आहे. शिवसेनेने तब्बल ५० जागांचा प्रस्ताव घेऊन राष्ट्रवादीकडे संपर्क साधल्याची माहिती असून, त्यामुळे पुण्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नंदनवन बाहेर निलेश राणेंच्या गाडी समोर एक महिला आल्याने पोलीस कर्मचाऱ्यांने साईटला व्हा म्हणता महिला चिडली
महिलेला सॉरी म्हणत निलेश राणे यांनी नंदनवनमध्ये प्रवेश केला
भाजप सरचिटणीस धनश्री तोडकर त्यांना आत्मदहनापासून परा वृत्त करण्यासाठी भाजप कार्यकर्ते त्यांच्या कार्यालयात दाखल
भाजपच्या सरचिटणीस धनश्री तोडकर यांचा पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करण्यावर ठाम
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने घेतला निर्णय
धनश्री तोडकर उद्या भाजपाच्या पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करणार
आज माझी आर्थिक परिस्थिती नसल्याच्या कारणामुळे पक्षाने तिकीट नाकारल्याची माहिती
राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकीच्या जागा वाटपाचा तिढा सुटता सुटेना....तर, भंडाऱ्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नावं गायब झाल्याचा प्रकार समोर आला. या विरोधात आज भंडाऱ्यात भाजप वगळता सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला आहे.
मनसे नेते अविनाश जाधव यांचे अगदी जवळचे समजले जाणारे जयेश खटके, प्रीतेश मोरें सह अनेक मनसेच्या सक्रिय कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश..
प्रीतेश मोरे व जयेश खटके हे मनसेच्या मध्यवर्ती कार्यालय असलेल्या नौपाडा विभागात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय असून अविनाश जाधव यांच्या अनेक आंदोलनात व उपोषणात त्यांचा सक्रिय भूमिका राहिली आहे..
मनसेच्या कार्यकर्त्यांनी हाती घड्याळ बांधल्याने हा मोठा धक्का समजला जातोय.
जागा वाटपावरून शिवसेनेत झालेल्या राड्यानंतर आता युतीवर अनिश्चिततेचे सावट आहे संजय शिरसाठ रात्री एकनाथ शिंदे यांना याबाबतची सगळी माहिती देणार आहे आणि रात्रीच याबाबत अंतिम निर्णय होऊ शकतो याबाबत रात्रीतनं अंतिम निर्णय घेऊन सकाळी दहा वाजता पत्रकार परिषदेत ते भूमिका जाहीर करणार त्यामुळे संभाजीनगर मध्ये शिवसेना-भाजपची युती होणार की नाही हे सकाळी दहा वाजता स्पष्ट होईल...
अकोल्यातील महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) या तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून सुरू असलेली चर्चा अधिकच लांबली आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार इंद्रनील नाईक गेल्या दोन दिवसांपासून अकोल्यात तळ ठोकून असून, आज शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड अकोल्यात दाखल झाले आहेत.
भाजप आणि शिवसेनेच काही ठरेना....
गेल्या 5 ते 6 तासांपासून भाजप आणि शिवसेनेत जागा वाटपावरून मोठी रस्सीखेच.
मुंबईतल्या काही जागांना घेऊन मोठी रस्सीखेच.
इच्छुक उमेदवार ab फॉर्म च्या प्रतिक्षेत
नंदनवन वर इच्छुकांची गर्दी
काँग्रेस पक्षात तिकीट वाटपावरुन हाणामारी...
अवघ्या १ दिवस उरले असताना आज काँग्रेस पक्षा वतीने AB फॉर्म ठाण्यातील काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात वाटप करत असताना काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आपापसात मध्ये भिडले आहे..
आज काँग्रेसने स्वबळाचा नारा देखील दिला होता