राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी प्रचंड राजकीय ड्रामा पाहायला मिळाला.
राज्याच्या प्रशासकीय आणि राजकीय दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आज दुपारी १२ वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार असून, बैठकीत राज्यातील विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.
( Delivery Boy ) डिलिव्हरी बॉय आज संपावर जाणार आहेत. 31 डिसेंबरला डिलिव्हरी बॉय संपावर जाणार असून विविध मागण्यांसाठी त्यांनी देशव्यापी संप पुकारला आहे. कामाची खालावलेली स्थिती, कमी होत जाणारी कमाई आणि सामाजिक सुरक्षेचा अभाव या प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया काल संपली असून, या निवडणुकीत २,५०१ पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मुंबईतील विविध विभागांमध्ये चांगलीच धावपळ पाहायला मिळाली.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये बंडखोरीचे सत्र जोरात सुरू असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. ठाकरे ब्रँडच्या युतीपासून ते भाजप–शिंदे सेना युतीपर्यंत अनेक वॉर्डमध्ये अधिकृत उमेदवारांव्यतिरिक्त अपक्ष अर्ज दाखल झाल्याने राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची बनली आहेत.
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार आता निर्णायक टप्प्यात प्रवेश करत असून, आजपासून प्रत्येक उमेदवाराचा प्रचाराचा वेग मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी, माघारी आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर आता थेट मैदानातील राजकीय लढत सुरू झाली आहे. त्यामुळे आजपासून राज्यातील विविध शहरांमध्ये प्रचाराचा जोर स्पष्टपणे दिसून येणार आहे.
Konkan Railway ) कोकण रेल्वे मार्गावर 30 दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. 1 ते 30 जानेवारी दरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) यार्डमधील दुरुस्ती व देखभालीचे काम हाती घेतल्याने कोकण रेल्वे मार्गावरील काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यातील एकूण 15 महापालिकांमध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटली आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नांदेड, अमरावती, मालेगाव, अकोला, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, धुळे, उल्हासनगर, सांगली, जालना, पिंपरी-चिंचवड, लातूर या शहरांमध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटली आहे. अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. या सर्व ठिकाणी अत्यंत नाट्यमय अशा घडामोडी घडलेल्या बघायला मिळाल्या. पण अखेर शेवटपर्यंत दोन्ही पक्षांचं नेत्यांचं युतीबाबत एकमत होऊ शकलं नाही. त्यामुळे या 15 महापालिकांमध्ये युती तुटल्याचं सध्याचं चित्र आहे
राज्य आणि देशातील हवामान सातत्याने बदलत आहे. देशाच्या काही भागात कडाक्याची थंडी, तर काही भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मॉन्सून संपून काही महिने झाले असले तरीही, काही भागांत पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. १ जानेवारी २०२६ रोजीही काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
देशातील ५० लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स यांचे लक्ष सध्या ८व्या वेतन आयोगावर केंद्रित झाले आहे. या संदर्भात केंद्र सरकारकडून मोठ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्षाचा दिलासा मिळणार आहे. १ जानेवारी २०२६ पासून ८ वा वेतन आयोग (8th Pay Commission) प्रभावी होणार आहे. सरकारने यासाठी आठवा केंद्रीय वेतन आयोगाचे सदस्य नियुक्त केले आहेत. तरीही, आयोगाला लागू होण्याची अंतिम तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. वेतन आयोग लागू झाल्यानंतर वाढलेले पगार लगेच मिळणार नाही, परंतु आयोग लागू झाल्यापासूनचा एरिअर नक्की मिळणार आहे. तज्ज्ञांच्या मते, सरकार लवकरच वेतनवाढीची अधिकृत घोषणा करेल आणि एरिअर देण्याची प्रक्रिया सुरु होईल.
(Ladki Bahin Yojana Ekyc ) 'लाडकी बहीण' योजनेतील ज्या महिलांनी केवायसी केली नाही आहे त्या महिलांना यापुढे लाडकी बहिण योजनेचे हप्ते मिळणार नाहीत. यासोबतच त्यांची नावे या योजनेतून बाद केली जाऊ शकतात. सरकारने 31 डिसेंबर 2025 पर्यंत e-KYC अनिवार्य केले आहे. ज्या महिला या वेळेत e-KYC करणार नाही त्यांचा लाभ थांबणार आहे. लाडक्या बहिणींना दर महिना दीड हजार रुपये दिले जात होते. अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींना ही रक्कम मिळत होती. मात्र सर्वच महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला पाहायला मिळत आहे.
(Kalyan - Dombivli) आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. काल एबी फॉर्मचं वाटप करण्यात आले. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. अनेकांना उमेदवारी नाकारल्याने इच्छुकांनी नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. कल्याण-डोंबिवलीत भाजपने विजयाचे खाते उघडल्याचे पाहायला मिळत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पॅनल क्रमांक 18 अ मध्ये भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी यांचा एकच अर्ज असून भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. 30 डिसेंबरपर्यंत महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार होते. आज 31 डिसेंबर रोजी उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे. तर 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आता जोरदार तयारीला लागले असून सभांचे आयोजन करण्यात येत आहे.
सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण देश सज्ज झाला असतानाच, ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे, नाशिकसह देशातील प्रमुख शहरांमध्ये पोलीस प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच नागरिकांना सुरक्षित आणि आनंददायी नववर्ष साजरे करता यावे, यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे.
केंद्र सरकारने (Central Goverment) सोशल मीडिया कंपन्यांना कडक इशारा दिला आहे. सरकारने त्यांना अश्लील आणि अश्लील सामग्री तसेच बाल लैंगिक शोषणाशी संबंधित बेकायदेशीर सामग्रीवर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सांगितले की सोशल मीडिया कंपन्या माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ७९ अंतर्गत आदेशाचे पालन करण्यास बांधील आहेत, असे सांगून की ते त्यांच्या प्लॅटफॉर्मवर अश्लील आणि अश्लील सामग्री अपलोड करणार नाहीत.
शेवटचा सुर्यास्त पाहण्यासाठी नागरिकांनी केली गर्दी..
भारतातील शेवटच्या सुर्यास्ताचे विस्मयकारक दृश्य..
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने इच्छुक उमेदवार सुनील सोनवणे यांनी मंत्री संजय शिरसाठ यांच्या घरासमोर आंदोलन सुरू केले आहे.
प्रभाग क्रमांक २० मधून उमेदवारी देण्यात यावी, अशी ठाम मागणी सोनवणे यांनी केली आहे.
पक्षाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत त्यांनी एकट्यानेच निषेध व्यक्त केला.
उमेदवारी वाटपाबाबत नाराजी वाढत असून, कार्यकर्त्यांमध्ये असंतोष दिसून येत आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी नवी मुंबई पोलीस सज्ज
नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे बीट
नववर्षाच्या स्वागतासाठी नवी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत
दोन हजार हून अधिक पोलीस तैनात आहे
कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सिव्हिल ड्रेस वरती देखील पोलीस तैनात असणार आहेत
तर रेव पार्टी वर देखील नवी मुंबई पोलिसांची करडी नजर असणार आहे
नवी मुबंईकर स्वतःची काळजी घेऊन नवं वर्ष साजरा करा ही विनंती
जगात सर्वात आधी न्यूझीलंडमध्ये नववर्षाचं स्वागत...
ऑकलंडमधील स्काय टॉवरवर फटाक्यांची शानदार आतषबाजी
वरळी, शिवडी, लालबाग, माहीमची धुरा निलेश राणे यांच्या खांद्यावर
तळ कोकणातली तोफ आता ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात धडाडणार
शिवसेना उमेदवारांसाठी निलेश राणे मैदानात
पुढचे 15 दिवस निलेश राणे ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात तळ ठोकणार
बंटीजागीदार यांच्यावर गोळीबार करण्यात आला..
अज्ञान हल्लेखोरांनी गोळीबार करत पसार झाले....
बंटी जागीरदार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर श्रीरामपूर येथील कामगार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू....
कब्रस्तान मधून काम आटपून बाहेर पडत असताना जर्मन हॉस्पिटल समोर दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला....
घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले असून हल्लेखोरांचा तपास सुरु....
पोस्टरवर बाळासाहेबांचा फोटो असल्याने शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या
'बाळासाहेबांचा फोटो असलेले पोस्टर फाडणाऱ्यांवर कारवाई करा'
युवासेना सरचिटणीस राहूल कनाल यांची कारवाईची मागणी
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंकडे केली मागणी
सचिन भेंडे यांनी युवा स्वाभिमान पार्टीकडून अधिकृत उमेदवारी प्रभाग क्रमांक 19 ड मधून दाखल केलेली आहे.. तर त्याच प्रभागातून भाजप नेते तुषार भारतीय यांनी सुद्धा उमेदवारी दाखल केली आहे..
तुषार भारतीय यांनी घेतलेल्या आक्षेपामध्ये सांगितले आहे की सचिन भेंडे हे महानगरपालिकेचे ठेकेदार असून त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी..
सध्या निवडणूक अधिकाऱ्याकडे तुषार भारतीय कडून तीन आणि सचिन भेंडे कडून तीन वकिलांची टीम आर्ग्युमेंट करत आहे..
- भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांना कार्यकर्त्यांनी पळवत निवडणूक कार्यालयात आणले...
- प्रभाग क्रमांक 13 मधील उमेदवारांच्या AB फॉर्ममध्ये चूक झाल्याने मोठा वाद...
- भाजपच्या दोन्ही इच्छुक उमेदवारांमध्ये जोरदार राडा...
- गोंधळाच्या दरम्यान भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांना चक्कर येऊन पडल्याची घटना...
- उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपमध्ये जीवघेणी धावपळ आणि गोंधळाचे चित्र
सुषमा अंधारेंचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश
संजय राऊत, भास्कर जाधव, अरविंद सावंत, सुषमा अंधारे यांचं स्टार प्रचारकांच्या यादीत नाव
उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे घेणार महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभा
3 जानेवारी पासून स्टार प्रचाराकांच्या सभांचा धडाका
जिल्ह्यातील पाच मल्टीस्टेट बुडाल्यानंतर पसरली अफवा
'नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये'
बुलढाणा अर्बनच्या बँक व्यवस्थापकांचं नागरिकांना आवाहन
भाजपच्या बंडखोर माया राजपूत यांच्याकडून वाॅर्ड क्रमांक ६४ मध्ये अर्ज
वाॅर्ड क्रमांक ६४ मधून भाजपकडून सरिता राजापुरे यांना उमेदवारी
- मध्यरात्री पार्टी करून ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्यांवर नागपूर पोलिसांची असणार बारीक नजर ...
- ड्रंक अँड ड्राईव करणाऱ्यांवर केली जात आहे कारवाई...
- पहाटे 5 वाजतापर्यँत हि कारवाई सुरु राहणार असल्याची माहिती नागपूरचे वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त लोहित मतानी यांनी दिली
- रात्री उशिरा पर्यंत बार आणि हॉटेल्स सुरू असणार मात्र त्यांच्यावर पोलिसांची राहणार करडी नजर
- ड्रिंक करून वाहन चालविणार्यावर चालणं होणार , अल्पवयीन मूल वाहन चालवताना आढळल्यास पालकांवर कारवाई होईल , जेल सुद्धा होऊ शकते
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी जनसुराज्य शक्ती पक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट एकत्र आले आहेत. या निवडणुकीत एक सक्षम पर्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. शहर विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून आम्ही दोघे एकत्र आलो आहोत. निवडणुकीनंतर महापालिकेतील सत्तेच्या जागा जनसुराज्य शक्ती पक्ष- आरपीआयकडे असतील अशी स्पष्ट ग्वाही जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
जळगाव महापालिकेत भाजपच्या उमेदवार उज्वला बेंडाळे बिनविरोध
प्रभाग क्रमांक 12 ब मधून उज्वला बेंडाळे यांनी केली होती उमेदवारी दाखल
उज्वला बेंडाळे यांच्या प्रतिस्पर्धी 2 उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने उज्वला बेंडाळे बिनविरोध
आज सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने शहरात गावागावात थर्टी फर्स्ट च्या नावाखाली अनेकजण दारूच्या पार्ट्या करताना दिसत आहेत..
दारू पिऊन लोकांचे तरुणांचे अपघात होतात अनेक वाईट घटना घडत असतात याला आळा बसावा म्हणून धाराशिव मधील धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठान च्या वतीने" दारू नको दूध प्या" असा उपक्रम राबवून शहरातील लोकांना मोफत दुध वाटप करण्यात आलं या उपक्रमाला अनेक तरुणांनी,लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने सर्वत्र या उपक्रमाचं कौतुक होताना दिसत आहे
भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचे निवडणूक आयोगाला पत्र
महापालिकेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला लिहिले पत्र
एबी फॉर्म रद्द करण्याची साटम यांनी पत्रातून केली मागणी
वॉर्ड क्रमांक १७३मधील प्रकार
शिल्पा केळुस्कर यांनी डुप्लिकेट एबी फॉर्म जोडल्याची भाजपची तक्रार