Uncategorized

अभिनेता पुनीत राजकुमारला हार्टअटॅक,रुग्णालयात दाखल

Published by : Lokshahi News

अभिनेता पुनीत राजकुमारला हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यामुळे त्याला बंगळुरुतील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या आयसीयूमध्ये त्याच्यावर उपचार सूरू आहे. दरम्यान या घटनेनंतर रूग्णालयाबाहेर चाहत्यांनी गर्दी केली आहे.

अभिनेता पुनीत राजकुमार आज दुपारी १ ते १.३० च्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यावेळी त्याला तातडीने बंगळुरुतील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तो आयसीयूमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. आत्ता काही सांगू शकत नाही. रुग्णालयात आणले तेव्हा त्यांची प्रकृती खराब होती, आयसीयूमध्ये उपचार सूरू असल्याची माहिती विक्रम हॉस्पिटलचे डॉ रंगनाथ नायक यांनी दिली.

पुनीत राजकुमार हा कन्नड सुपरस्टार डॉ. राजकुमार यांचा सर्वात लहान मुलगा आणि प्रख्यात स्टार KFI शिवराज कुमार यांचा धाकटा भाऊ आहे. त्याने बालकलाकार म्हणून तब्बल १२ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. १९८६ मध्ये बेट्टाड हूवू (Bettada Hoovu) या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट बाल अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. त्याने आतापर्यंत आकाश (२००५), अरसु (२००७), मिलन (२००७) आणि वंशी (२००८) यासारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा