India

ओवैसींच्या AIMIM पक्षाचं ट्विटर हॅक, एलन मस्कचा लावला फोटो

Published by : Lokshahi News

खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल (एआयएमआयएम) पक्षाचं अधिकृत ट्विटर खातं हॅक झालं आहे. यानंतर एमआयएमच्या ट्विटर हँडलवर स्पेसएक्स आणि टेस्लाचे मालक एलन मस्कटा फोटो लावण्यात आला. त्यात त्याने मास्क घातलं आहे.

हे खातं कुणी हॅक केलं आणि का केलं? याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. ओवैसी यांच्या पक्षाने नुकतंच उत्तर प्रदेशात १०० जागा लढवण्याची घोषणा केली आहे.

यासाठी पक्षाने सुहेलदेव भारतीय समाज पार्टीसोबत युती केली आहे. त्याचबरोबर छोट्या पक्षांना सोबत घेण्यासाठी रणनिती आखली जात आहे. यानंतर ओवैसी विरोधकांच्या रडारवर आले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा