India

एअर इंडियाचा मोठा निर्णय, अमेरिकेची १४ उड्डाणे रद्द!

Published by : Lokshahi News

5G इंटरनेट सेवा (5G internet deployment) आजपासून म्हणजे बुधवारपासून अमेरिकेतील विमानतळांवर (US Airport) लागू केली जात आहे. त्यामुळे एअर इंडियाच्या (AIR- India) विमानसेवेवर परिणाम होणार आहे. एअर इंडियाने अमेरिकेला जाणारी काही उड्डाणे रद्द केली आहेत, तर काहींच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. याबाबत एअर इंडियाने ही माहिती दिली आहे.

एअर इंडियाशिवाय एमिरेट्सनेही (Dubai Emirates Airlines) उड्डाणे स्थगित केली आहेत. सर्व निप्पॉन एअरवेज, जपान एअरलाइन्सनीही (Japan airlines) अमेरिकेची उड्डाणे स्थगित केली आहेत. (5G network in USA)

जगभरात वापरल्या जाणार्‍या बोईंग 777 या विमानांवर नवीन हाय-स्पीड वायरलेस सेवेचा मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशारा आम्हाला देण्यात आल्याचे काही एअरलाइन्सने सांगितले. पण उड्डाणं रद्द केल्याने विमान सेवेवर किती परिणाम होईल हे स्पष्ट नाही. आपली सेवा सुरू ठेवण्यासाठी फक्त वेगवेगळी विमाने वापरण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे अनेक एअरलाइन्सने म्हटले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा