ajit pawar jahirnama 
Vidhansabha Election

Ajit Pawar यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. येत्या 5 वर्षात पक्षाकडून कोणती कामे केली जातील याबाबत अजित पवार यांच्याकडून आश्वासन देण्यात आलं आहे.

Published by : Team Lokshahi

राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता सर्वच पक्ष प्रचाराला लागले आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. येत्या 5 वर्षात पक्षाकडून कोणती कामे केली जातील याबाबत अजित पवार यांच्याकडून आश्वासन देण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील सर्व घटकांना, समाजाचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठी, विविध विकासकामासाठी, बदल घडवण्यासाठी काही योजना समोर आणल्या, लाडकी बहिण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज, वर्षाला 3 गॅस सिलेंडर, आर्थिक दुर्बल घटकांतील मुलींसाठी मोफत शिक्षण यासारख्या योजना राबवल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते राज्यव्यापी जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. तसेच पक्षातर्फे लढवल्या जाणाऱ्या साधारण 59 मतदारसंघासाठी स्वतंत्र जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. महायुतीचा एकत्रितपणे जाहीरनामा प्रकाशित करण्यात येणार असल्याचे यावेळी अजित पवार यांनी म्हटले आहे.

शेती आणि शेतकऱ्यांसाठी अनेक सूक्ष्म लघु मध्यम अशा युनिटच्या स्थापना लवकरात लवकर सुरू केलं जाईल. बारामतीत भव्य लॉजिस्टिक पार्कची निर्मिती केली जाणार आहे. देशात बारामती म्हणून बारामतीची ओळख सोलर शहर म्हणून निर्माण करणार असल्याचे जाहीरनाम्यात म्हटलं आहे.

जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या घोषणा-

  • लाडकी बहिण योजने संदर्भात बहिणींना दीड हजर नाही तर तबल 2100 रुपये देण्यात येणार

  • महिला सुरक्षेसाठी 25 हजार महिलांचा पोलिस दलात समावेश करणार

  • धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये देण्याचा वादा

  • ग्रामीण भागात 45000 पाणंद रस्त्यांच्या निर्मितीचा वादा

  • शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा आणि शेतीपिकांच्या एमएसपीवर 20% अनुदान देण्याचा वादा

  • वीज बिलात 30% कपात करून सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देण्याचा वादा

  • वृद्ध पेन्शन धारकांना आता पंधरा हजार रुपये नाही तर महिन्याला 21000 रुपये देण्याचा वादा

  • दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून महिन्याला दहा हजार रुपये विद्यावेतनाचा वादा

  • 25 लाख रोजगार निर्मितीचा वादा

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Janasuraksha Bill : विरोधकांच्या सभात्यागानंतरही विधान परिषदेत जनसुरक्षा विधेयक मंजूर

Indian Coast Guard : अंदमान समुद्रात भारतीय तटरक्षक दलाची धाडसी कारवाई; 'Sea Angel' नौकेचे यशस्वी बचाव अभियान

Chhatrapati Sambhajinagar : धनगर विद्यार्थ्यांच्या शिक्षण योजनेत भ्रष्टाचार; दोन शाळांची मान्यता रद्द, अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

Latest Marathi News Update live : जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेतही मंजूर