India

शेतकरी आंदोलन : आंतरराष्ट्रीय स्तरावरून उमटलेल्या प्रतिक्रियांना मोदी सरकारचे उत्तर

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क

नव्या कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. काही आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटिजनी या आंदोलनाचे समर्थन केले आहे. त्याला देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने उत्तर दिलेले आहेच. त्याशिवाय, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील ट्विट करत, कोणताही अपप्रचार देशाची एकता तोडू शकत नाही, असे म्हटले आहे.

पॉपस्टार रिहानाने ट्विट करत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यासोबतच पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने सुद्धा यावर ट्विट करत, आम्ही सर्व भारतात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या या आंदोलनात शेतकऱ्यांना पाठिंबा देत आहोत, असे म्हटले आहे. त्यावरून परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. सत्य जाणून घेतल्यानंतरच शेतकरी आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देणे योग्य ठरले असते, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी ट्वीट केले आहे.
कोणताही अपप्रचार देशाची एकता तोडू शकत नाही. कोणताही अपप्रचार भारताला विकासाचे शिखऱ गाठण्यापासून रोखू शकत नाही, अपप्रचार नव्हे तर, विकासच भारताचे भवितव्य ठरवू शकतो. भारत एकसंध आहे आणि एकसंध राहूनच विकासकडे वाटचाल करेल, असे अमित शाह यांनी म्हटले आहे.
संबित पात्रा यांची टीका
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि रिहाना यांना कृषी कायद्यांबाबत अजिबात माहिती नाही. तरीही ते या कायद्यासंदर्भात भाष्य करीत आहेत. कॅलिफोर्नियात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. तेव्हा यापैकी कुणीही बोलले नव्हते, असे भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले आहे.
हिंसाचार करणाऱ्यांना सोडून द्यायची मागणी राहुल गांधी करत आहेत. त्या व्यक्ती राहुल गांधी यांच्या नातलग आहेत का? की, रस्त्यांवर गोळ्या चालाव्यात, रक्तपात व्हावा, अशी राहुल गांधींची इच्छा आहे का, असा सवाल संबित पात्रा यांनी केला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा