Vidhansabha Election

Amit Thackeray: अमित ठाकरे अर्ज भरण्यासाठी रवाना ; अर्ज भरण्यापूर्वी घेतले देवदर्शन

अमित ठाकरे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत आणि अशातच आज माहितमध्ये अमित ठाकरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Published by : Team Lokshahi

अमित ठाकरे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत आणि अशातच आज माहितमध्ये अमित ठाकरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. मनसेकडून अमित ठाकरे यांना माहितमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती, त्यादरम्यान आता अमित ठाकरे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले आहेत.

तर मनसे कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे. अमित ठाकरे यांनी सिद्धीविनायक गणपतीचं दर्शन घेऊन आणि बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून तसेच चैत्यभूमिवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून ते अर्ज दाखल करण्यासाठी रवाना होत आहेत. अमित ठाकरे यांच्या विरोधात मविआकडून महेश सावंत यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. यावेळी राज ठाकरे देखील स्वतः अमित ठाकरेंचा अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

याचपार्श्वभूमीवर अमित ठाकरे म्हणाले की, कोणताच मेसेज द्यायचा नाही, देवाच्या बाबतीत मला सर्व गोष्टी करायला आवडतात. त्यामुळे मी सिद्धीविनायकला पण अनवाणी जाणार आहे. मी आज एवढी मोठी गोष्ट करायला जात आहे त्यामुळे देवाचे आशिर्वाद घेण गरजेच आहे. मी देवाकडे कधीच काही मागत नाही मला देवाने खुप दिल आहे. त्याने जे दिल आहे त्याचे आभार मी मानतो.

वरळी विधानसभा मतदार संघात होणाऱ्या तिरंगी लढतीवर अमित ठाकरे म्हणाले की, संदीप देशपांडे हे 100 टक्के जिंकणार तिथे कारण त्याचं ज्याप्रकारचं काम मी पाहिल आहे ते अतिशय उत्तम आहेत. इथे पण ते नगरसेवक असताना त्यांनी जे काम केलं त्यावरुन माझा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यांना जिंकवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. मी माहिममध्ये पर्यावरणासाठी काम करत राहणार, असं अमित ठाकरे म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा