Vidhansabha Election

Amit Thackeray Sada Sarvankar Meet : मतदानाआधी ग्रेटभेट! सरवणकरांचा अमित ठाकरे यांच्यासोबत हँडशेक

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अमित ठाकरे आणि सदा सरवणकर यांची ग्रेटभेट! सिद्धिविनायक मंदिरात दोघांनी घेतले गणपतीचे दर्शन आणि दिल्या एकमेकांना शुभेच्छा.

Published by : shweta walge

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यात 288 मतदारसंघासाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडत आहे. या 288 जागांसाठी 4 हजार 136 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि त्यांच्या विरुद्ध शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे महेश सावंत हे मैदानात उतरले आहेत. त्यामुळे माहीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. त्यातच आता मतदानापूर्वी अमित ठाकरे आणि सदा सरवणकर हे एकमेकांसमोर आले आहेत.

तर आज मतदान करण्यापूर्वी अमित ठाकरे हे श्री सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शन करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी सदा सरवणकर हे देखील श्री सिद्धिविनायक मंदिरात गणपतीचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले. यावेळी श्री सिद्धिविनायक मंदिराच्या पटांगणात अमित ठाकरे आणि सदा सरवणकर हे एकमेकांसमोर आले. यावेळी त्यांनी दोघांनी हात मिळवत एकमेकांनी शुभेच्छा दिल्या. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा