बजेट 2025

Devendra Fadnavis On Budget 2025: 'अर्थसंकल्पात मुंबई आणि महाराष्ट्रासाठी भरभरुन तरतूद' मुख्यमंत्री दिली ट्वीट करत माहिती

2025 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटद्वारे हे जाहीर केलं. मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे.

Published by : Prachi Nate

आज संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सकाळी 11 वाजता हा अर्थसंकल्प सादर केले. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केले, या अर्थसंकल्पात अनेक मुद्दे मांडण्यात आले. याचपार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पुढची 5 वर्षे विकासाची संधी देणार असं म्हटलं आहे.

तसेच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात अर्थव्यस्थेला गती देण्याचं उद्दिष्ट ठेवत, मेक इन इंडियावर भर देण्याचा प्रयत्न करणार असं निर्मला सीतारामण अर्थसंकल्प सादर करत असताना म्हणाल्या आहेत. या बजेटमध्ये गरीब, युवक आणि महिलांकडे लक्ष देण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. याचपार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्वीट करत अर्थसंकल्पात मुंबई आणि महाराष्ट्रासाठी भरभरुन तरतूद केल्याची माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पोस्ट

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्र!

मुंबई मेट्रो : 1255.06 कोटी

पुणे मेट्रो : 699.13 कोटी

एमयुटीपी : 511.48 कोटी

एमएमआरसाठी एकात्मिक आणि हरित प्रवासी सुविधा: 792.35 कोटी

मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे : 4004.31 कोटी

सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक क्लस्टर : 1094.58 कोटी

महाराष्ट्र ग्रामीण जोडसुधार प्रकल्प: 683.51 कोटी

महाराष्ट्र अ‍ॅग्रीबिझनेस नेटवर्क : 596.57 कोटी

नागनदी सुधार प्रकल्प : 295.64 कोटी

मुळा-मुठा नदी संवर्धन : 229.94 कोटी

ऊर्जा कार्यक्षम उपसा सिंचन प्रकल्प : 186.44 कोटी

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा