Vidharbha

Amravati Accident | अमरावतीत युवक काँग्रेसच्या पदाधिकारीच्या वाहनाला ट्रकची धडक

Published by : Pankaj Prabhakar Rane

सूरज दाहाट -अमरावती | अकोला (Akola) येथे आयोजित युवक काँग्रेसचा (Congress) कार्यक्रम आटपून अमरावतीला परत येणाऱ्या युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वाहनाला दर्यापूर जवळ आराळा येथे ट्रकने धडक दिली. शनिवारी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात युवक काँग्रेस अमरावती (Amravati) लोकसभा महासचिव रोहित अजय देशमुख (Rohit Ajay Deshmukh) (27) हे जागीच ठार झाले. या घटनेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे.

पाच जण जखमी

या अपघातात रोहित देशमुख यांच्यासोबत कारमध्ये असणारे युवक काँग्रेसचे अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख (Vaibhav Deshmukh) , चांदुर रेल्वेचे माजी आमदार वीरेंद्र जगताप (Virendra Jagtap) यांचा मुलगा परीक्षित जगताप, युवक काँग्रेसचे मेळघाट विधानसभा अध्यक्ष पंकज मोरे (Pankaj More) आणि वाहनचालक व सनी नावाचा युवक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा